Maharashtra Weather Agrowon
हवामान

Weekly Weather: बहुतांश जिल्ह्यांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Forecast: मार्च ते मे या कालावधीत होणाऱ्या पूर्वमोसमी पावसाने राज्यभर हजेरी लावण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार बहुतांश जिल्ह्यांत ढगाळ वातावरण राहून काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

 डॉ. रामचंद्र साबळे 

IMD Prediction: मार्च ते मे या कालावधीत होणाऱ्या पावसाला ‘पूर्वमोसमी पाऊस’ असे संबोधले जाते. सूर्याचे उत्तरायण सुरू झाल्यानंतर भारताच्या दक्षिण भागातील कमाल व किमान तापमानात वाढ होत जाते. त्यामुळे हवेचे दाब कमी होतात. आज (ता. ३०) महाराष्ट्रावरील हवेचे दाब १००६ हेप्टापास्कल इतके कमी होऊन हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. त्याच वेळी अरबी समुद्राच्या व हिंदी महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमानही ३० अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल.

त्यामुळे मोठ्या प्रमाणात बाष्प निर्मिती होऊन बहुतांशी जिल्ह्यात वातावरण ढगाळ राहील. आणि पावसाची शक्यता निर्माण होईल, असे भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविले आहे. उद्यापासून बुधवारपर्यंत (ता. ३१ मार्च ते २ एप्रिल) हवेच्या दाबात वाढ होऊन ते १००८ हेप्टापास्कल, तर गुरुवार व शुक्रवारी (ता.३, ४ एप्रिल) पुन्हा हवेचे दाब १०१० हेप्टापास्कलपर्यंत वाढतील आणि पावसाची शक्यता कमी होईल. एप्रिल महिन्यात कमाल व किमान तापमानात वाढ होत जाईल.

प्रशांत महासागराच्या पेरुजवळ समुद्राच्या पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान १७ अंश सेल्सिअसपर्यंत, तर इक्वॅडोरजवळ ते २६ अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल. त्यामुळे ‘ला-निना’चा प्रभाव वाढेल, आणि पूर्वमोसमी पावसाची शक्यता निर्माण होईल.

कोकण

आज (ता. ३०) सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९ मि.मी., रत्नागिरी जिल्ह्यात ५ मि.मी., तर उद्या (ता. ३१) सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४ मि.मी., रत्नागिरी जिल्ह्यात ४ मि.मी. पावसाची शक्यता राहील. मंगळवार (ता.१ एप्रिल) सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३ मि.मी., रत्नागिरी जिल्ह्यात २ मि.मी., रायगड जिल्ह्यात ६ मि.मी., ठाणे जिल्ह्यात ७ मि.मी., पालघर जिल्ह्यात ९ मि.मी., तर बुधवार (ता.२ एप्रिल) सिंधुदुर्ग जिल्ह्यात २ मि.मी., रत्नागिरी जिल्ह्यात ३ मि.मी., रायगड जिल्ह्यात ९ मि.मी., ठाणे जिल्ह्यात ९ मि.मी., पालघर जिल्ह्यात ५ मि.मी. पावसाची शक्यता आहे.

कमाल तापमान सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस, तर रत्नागिरी व पालघर जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस आणि ठाणे जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान पालघर व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस, तर रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस आणि ठाणे जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. मात्र पालघर जिल्ह्यात आकाश निरभ्र राहणे शक्य आहे. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ५ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.

उत्तर महाराष्ट्र

आज आणि उद्या (ता. ३०, ३१) पावसाची शक्यता नाही. मात्र मंगळवार (ता.१ एप्रिल) नाशिक जिल्ह्यात १२ मि.मी., धुळे जिल्ह्यात १२ मि.मी., नंदुरबार जिल्ह्यात ६ मि.मी., जळगाव जिल्ह्यात ५ मि.मी., तर बुधवार (ता. २ एप्रिल) नाशिक जिल्ह्यात ८ मि.मी., धुळे जिल्ह्यात ५ मि.मी., नंदुरबार जिल्ह्यात ३ मि.मी., जळगाव जिल्ह्यात १३ मि.मी. पावसाची शक्यता राहील.

कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअस, तर धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत ३९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक व धुळे जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस, तर जळगाव जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस आणि नंदुरबार जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस राहील. नाशिक जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ, तर धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नंदुरबार जिल्ह्यात ३६ टक्के, तर धुळे व जळगाव जिल्ह्यांत ५८ टक्के आणि नाशिक जिल्ह्यात ६० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता नाशिक व नंदुरबार जिल्ह्यांत १६ ते २० टक्के, तर धुळे व जळगाव जिल्ह्यांत ५१ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ६ कि.मी., तर दिशा ईशान्येकडून राहील.

मराठवाडा

आज (ता.३०) धाराशिव जिल्ह्यात ५ मि.मी., लातूर जिल्ह्यात २ मि.मी. नांदेड जिल्ह्यात ३ मि.मी., तर उद्या (ता.३१) धाराशिव जिल्ह्यात ३ मि.मी., बीड २ मि.मी. पावसाची शक्यता आहे. मंगळवार (ता.१) धाराशीव जिल्ह्यात २ मि.मी., छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४ मि.मी., तर बुधवार (ता.२) धाराशिव जिल्ह्यात ३ मि.मी., लातूर जिल्ह्यात २ मि.मी. नांदेड जिल्ह्यात ३ मि.मी., बीड जिल्ह्यात ६ मि.मी., परभणी जिल्ह्यात ५ मि.मी., हिंगोली जिल्ह्यात ३ मि.मी., जालना जिल्ह्यात ६ मि.मी., छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ८ मि.मी. पावसाची शक्यता राहील.

कमाल तापमान धाराशिव व लातूर जिल्ह्यांत ३८ अंश सेल्सिअस, तर नांदेड, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ४० अंश सेल्सिअस राहील. तर बीड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान जालना जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस, तर परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान धाराशिव, नांदेड, बीड जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस, तर लातूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील.

धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता जालना जिल्ह्यात २० टक्के, तर बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ३८ टक्के राहील. लातूर, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ४१ ते ४८ टक्के, तर धाराशिव व नांदेड जिल्ह्यांत ६६ ते ७० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता जालना व नांदेड जिल्ह्यांत ८ ते ९ टक्के, तर हिंगोली, बीड व परभणी जिल्ह्यांत २१ ते २५ टक्के राहील. धाराशिव व लातूर जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ३० ते ३८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते ११ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.

पश्‍चिम विदर्भ

आज, उद्या आणि परवा (ता.३०,३१ मार्च, १ एप्रिल) पावसाची शक्यता नाही. मात्र बुधवारी (ता.२ एप्रिल) बुलडाणा आणि अकोला जिल्ह्यांत ३ मि.मी., वाशीम जिल्ह्यात २ मि.मी., तर अमरावती जिल्ह्यात ३ मि.मी. पावसाची शक्यता राहील. कमाल तापमान वाशीम जिल्ह्यात ३९ अंश सेल्सिअस, तर बुलडाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यांत ४० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान अमरावती जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस, तर बुलडाणा, अकोला व वाशीम जिल्ह्यांत ४० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता बुलडाणा जिल्ह्यात ३२ टक्के, तर अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ४१ ते ४६ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता बुलडाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यांत २२ ते २४ टक्के आणि वाशीम जिल्ह्यात ३० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ९ ते १४ कि.मी. राहील.

मध्य विदर्भ आज, उद्या आणि परवा (ता.३०,३१, १ एप्रिल) पावसाची शक्यता नाही. मात्र, बुधवारी (ता.२ एप्रिल) यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात अल्पशा पावसाची शक्यता आहे. यवतमाळ वर्धा व नागपूर जिल्ह्यांत कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान वर्धा व नागपूर जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस, तर यवतमाळ जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नागपूर व वर्धा जिल्ह्यांत २८ ते ३५ टक्के, तर यवतमाळ जिल्ह्यात ४१ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १४ ते १८ टक्के इतकी कमी राहील.

पूर्व विदर्भ

चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांत कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गोंदिया जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २५ ते २८ टक्के, तर चंद्रपूर जिल्ह्यात ३८ टक्के आणि गडचिरोली जिल्ह्यात ४३ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत १४ ते १६ टक्के, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत २७ ते २८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ११ ते १४ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा चंद्रपूर जिल्ह्यात आग्नेयेकडून, तर उर्वरित जिल्ह्यांत नैऋत्येकडून राहील.

पश्‍चिम महाराष्ट्र

आज (ता.३०) कोल्हापूर जिल्ह्यात १० मि.मी., सांगली जिल्ह्यात ५ मि.मी., सातारा ४ मि.मी., सोलापूर ३ मि.मी. पावसाची शक्यता आहे. मात्र पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत पावसाची शक्यता नाही. उद्या (ता.३१) कोल्हापूर जिल्ह्यात ७ मि.मी., सांगली व सातारा जिल्ह्यांत ८ मि.मी., सोलापूर जिल्ह्यात ५ मि.मी., पुणे जिल्ह्यात ४ मि.मी. राहील. मंगळवार (ता.१ एप्रिल) कोल्हापूर जिल्ह्यात ३ मि.मी., सांगली व सातारा जिल्ह्यांत ४ मि.मी., सोलापूर जिल्ह्यात ३ मि.मी., पुणे जिल्ह्यात ७ मि.मी. आणि अहिल्यानगर जिल्ह्यात ८ मि.मी. पावसाची शक्यता राहील. तर बुधवार (ता.२ एप्रिल) कोल्हापूर जिल्ह्यात १ मि.मी., सांगली व सातारा जिल्ह्यांत २ ते ३ मि.मी., सोलापूर जिल्ह्यात २ मि.मी., पुणे जिल्ह्यात १० मि.मी. पावसाची शक्यता राहील.

कमाल तापमान कोल्हापूर जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस, तर उर्वरित सांगली, सातारा, सोलापूर, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत ३९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस, तर कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील. सांगली व सोलापूर जिल्ह्यांत किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते १० कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.

कृषी सल्ला

भाजीपाला पिकांमध्ये सिंचनाचे काटेकोर नियोजन करावे.

फळबागांमध्ये सेंद्रिय आच्छादन करावे. ठिबक सिंचनाचा कालावधी वाढवावा.

जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध व्हावा म्हणून आफ्रिकन टॉल मक्याची पेरणी करावी.

कुक्कुटपालन शेडमध्ये पाण्याची भांडी वाढवावीत.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ,सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT