Weather Update Agrowon
हवामान

Maharashtra Rain: राज्यातील अनेक भागात पावसाची शक्यता; दोन दिवस पावसाला पोषक हवामान

Weather Update: शुक्रवारी आणि शनिवारी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Pune News: राज्यातील काही भागात ढगाळ वातावरणासाठी पोषक हवामान होते. त्यामुळे उद्या म्हणजेच शुक्रवारी आणि शनिवारी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

हवामान विभागाने आज, नंदूरबार, अकोला, बुलडाणा जिल्ह्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो, तर कोल्हापूर जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी विजांसह हलका पाऊस पडू शकतो, असा अंदाज दिला.

तर उद्या म्हणजेच शुक्रवारी तीन जिल्ह्यांमध्ये तर शनिवारी सहा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज दिला आहे. उद्या जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज दिला.  

तसेच सिंधुदूर्ग, धुळे, नगर, सांगली, सोलापूर, बीड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, गोंदीया आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी किरकोळ पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

तसेच शनिवारी जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नगर, पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात विजांसह हलक्या पावसाचा काही ठिकाणी अंदाज आहे. तर सिंधुदूर्ग, रत्नागिरी, धुळे, नंदूरबार, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. अनेक भागात ढगाळ वातावरण असल्याने थंडीही कमी झाल्याचे दिसते. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Flood Fishermen Compensation: पूरग्रस्त मत्स्य व्यावसायिकांना चार कोटींची भरपाई मंजूर

CPIM Protest: बीड जिल्ह्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची निदर्शने

Crop Loan Rates: पीकनिहाय कर्जदर निश्चित

Sugarcane Payments Pending: साखर कारखान्यांकडे अडकले शेतकऱ्यांचे ८७६ कोटी रुपये

Jowar Prices Low: ज्वारीला कमी दर; शेतकरी आर्थिक अडचणीत

SCROLL FOR NEXT