Agriculture Weather Agrowon
हवामान

Weekly Weather : राज्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

 डॉ. रामचंद्र साबळे 

Weather Update : महाराष्ट्रावर या आठवडाभर १००२ हेप्टापास्कल, तर बंगालच्या उपसागरावर ९९८ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. त्यामुळे बंगालच्या उपसागराची शाखा कार्यरत होईल. वारे पूर्वेकडून उत्तरेस व नंतर पश्चिमेस व उत्तरेस वाहतील. तसेच अरबी समुद्रावरून नैऋत्य दिशेने वाहणारे वारे महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरातच्या दिशेने वेगाने वाहतील. आणि त्याही दिशेने मॉन्सून उत्तरेच्या दिशेने पुढे वाटचाल करत राहील.

या आठवड्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे. कोकणात विस्तृत स्वरूपात, मध्य महाराष्ट्रात मध्यम ते विस्तृत स्वरूपात पावसाची शक्यता राहील. मराठवाड्यात मध्यम स्वरूपात तर काही दिवशी अल्पशा, विदर्भात मध्यम स्वरूपात, पश्चिम महाराष्ट्रात काही दिवशी जोरदार, तर काही दिवशी पावसात उघडीप राहील.

कोकण वगळता इतर सर्व विभागांत काही दिवशी पावसात उघडीप राहण्याची शक्यता आहे. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. वाऱ्याची दिशा पश्चिम व मध्य विदर्भात वायव्येकडून राहील. त्यामुळे पावसाचे प्रमाण मध्यम स्वरूपातच राहील. नाशिक, धुळे, नंदूरबार धाराशिव, लातूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलडाणा, अकोला, वाशीम, सांगली, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग २२ ते २८ किमी राहील.

प्रशांत महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे विषुववृत्तीय भागातील तापमान १५ ते २३ अंश सेल्सिअस इतके घसरले असून हिंदी महासागराच्या विषुववृत्तीय भागातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान

३१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. त्यामुळे ‘ला-निना’चा प्रभाव वाढला आहे. या वरून यावर्षी महाराष्ट्रातील काही भागांत पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

कोकण

आज (ता.२१) सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५४ मिमी, रायगड जिल्ह्यात ५८ मिमी, ठाणे जिल्ह्यात ५० मिमी, पालघर जिल्ह्यात ७८ मिमी, तर उद्या (ता.२२) ठाणे जिल्ह्यात ६३ मिमी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७२ मिमी, रायगड जिल्ह्यात १०४ मिमी व पालघर जिल्ह्यात १०५ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १२ ते १७ किमी राहील. कमाल तापमान रायगड व ठाणे जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस, तर सिंधुदुर्ग, ठाणे व पालघर जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील.

आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९२ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८२ ते ९० टक्के राहील.

उत्तर महाराष्ट्र

आज (ता.२१) नाशिक जिल्ह्यात ५ मिमी, धुळे जिल्ह्यात ७ मिमी, नंदूरबार जिल्ह्यात ५ मिमी व जळगाव जिल्ह्यात १० मिमी पावसाची शक्यता आहे. उद्या (ता.२२) नाशिक जिल्ह्यात ३० मिमी, धुळे जिल्ह्यात २२ मिमी, नंदूरबार जिल्ह्यात १३ मिमी व जळगाव जिल्ह्यात १३ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग २० ते २४ किमी राहील. कमाल तापमान नाशिक व जळगाव जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस, तर धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत ३० ते ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८३ ते ८८ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६० ते ७४ टक्के राहील.

मराठवाडा

आज (ता.२१) धाराशिव जिल्ह्यात ३० मिमी, लातूर जिल्ह्यात २२ मिमी, नांदेड जिल्ह्यात २९ मिमी, बीड जिल्ह्यात १५ मिमी, परभणी जिल्ह्यात २८ मिमी, हिंगोली जिल्ह्यात १६ मिमी, जालना जिल्ह्यात १५ मिमी व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १२ मिमी पावसाची शक्यता आहे. उद्या (ता.२२) धाराशिव जिल्ह्यात ३० मिमी, लातूर जिल्ह्यात ३२ मिमी, नांदेड जिल्ह्यात ३१ मिमी, बीड जिल्ह्यात १८ मिमी, परभणी जिल्ह्यात ३२ मिमी, हिंगोली जिल्ह्यात १८ मिमी, जालना जिल्ह्यात २१ मिमी व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १६ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग धाराशिव व लातूर जिल्ह्यात ताशी २३ ते २४

किमी, तर जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ताशी २२ किमी राहील. परभणी व हिंगोली जिल्ह्यांत वाऱ्याचा वेग ताशी २१ किमी, तर नांदेड जिल्ह्यात ताशी २० किमी राहील. कमाल तापमान धाराशिव, लातूर, हिंगोली जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस, तर नांदेड व परभणी जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस राहील. बीड, जालना व संभाजीनगर जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८५ ते ९१ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६४ ते ८० टक्के राहील.

पश्चिम विदर्भ

आज (ता.२१) अकोला व वाशीम जिल्ह्यांत १२ मिमी, बुलडाणा जिल्ह्यात १६ मिमी व अमरावती जिल्ह्यात ९ मिमी पावसाची शक्यता आहे. उद्या (ता.२२) अकोला जिल्ह्यात १० मिमी, बुलडाणा जिल्ह्यात १७ मिमी, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत २७ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. त्याचा पावसाचे प्रमाणावर परिणाम होईल. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यांत २७ ते २८ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८४ ते ८७ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६५ ते ६७ टक्के राहील.

मध्य विदर्भ

आज (ता.२१) वर्धा जिल्ह्यात १० मिमी, यवतमाळ जिल्ह्यात १४ मिमी व नागपूर जिल्ह्यात १७ मिमी पावसाची शक्यता आहे. उद्या (ता.२२) यवतमाळ जिल्ह्यात १८ मिमी, वर्धा जिल्ह्यात २७ मिमी व नागपूर जिल्ह्यात २२ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १५ ते २० किमी राहील. कमाल तापमान वर्धा व नागपूर जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस, तर यवतमाळ जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८५ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७८ ते ८२ टक्के राहील.

पूर्व विदर्भ

आज (ता.२१) चंद्रपूर जिल्ह्यात २५ मिमी, गडचिरोली जिल्ह्यात १५ मिमी, भंडारा जिल्ह्यात ३५ मिमी व गोंदिया जिल्ह्यात ९ मिमी पावसाची शक्यता आहे. उद्या (ता.२२) चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात १५ मिमी, भंडारा जिल्ह्यात ३० मिमी, तर गोंदिया जिल्ह्यात ३४ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते १४ किमी राहील. कमाल तापमान चंद्रपूर जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस, तर गडचिरोली जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस, भंडारा जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस आणि गोंदिया जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ८८ ते ९६ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६८ ते ८३ टक्के राहील.

पश्चिम महाराष्ट्र

आज (ता.२१) कोल्हापूर जिल्ह्यात ३४ मिमी, सांगली जिल्ह्यात १७ मिमी, सातारा जिल्ह्यात ३३ मिमी, सोलापूर जिल्ह्यात २४ मिमी, पुणे जिल्ह्यात १४ मिमी, नगर जिल्ह्यात ३ मिमी पावसाची शक्यता आहे. उद्या (ता.२२) कोल्हापूर जिल्ह्यात ४० मिमी, सांगली जिल्ह्यात २१ मिमी, सातारा जिल्ह्यात ५८ मिमी, सोलापूर जिल्ह्यात ३२ मिमी, पुणे जिल्ह्यात ३१ मिमी व नगर जिल्ह्यात ६ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १८ ते २८ किमी राहील. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यांत २७ ते २८ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९४ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८५ ते ९० टक्के राहील.

कृषी सल्ला

जास्त पाऊस झालेल्या ठिकाणी शेतात साचलेले अतिरिक्त पाणी शेताबाहेर जाण्यासाठी वाट करावी.

भात रोपांच्या पुनर्लागवडीस सुरुवात करावी.

पेरणीनंतर उगवण झालेल्या ठिकाणी हेक्टरी रोपांची संख्या योग्य राखण्यासाठी विरळणी करावी.

जनावरांचा गोठा कायम स्वच्छ, कोरडा आणि हवेशीर राहील याची काळजी घ्यावी.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pm Aasha Scheme : 'पीएम आशा'तून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण ?

Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा

Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Poultry Business : भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात, सांगली जिल्ह्यात परिस्थिती

SCROLL FOR NEXT