RainMaharashtra agrowon
हवामान

Maharashtra Rain Alert : विदर्भात हलक्या ते जोरदार सरी शक्य

Monsoon Rain News : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर आले आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर मॉन्सून सक्रिय असून, राज्यातही हलक्या सरी शिंपण करत आहे.

अमोल कुटे

Pune News : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर आले आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर मॉन्सून सक्रिय असून, राज्यातही हलक्या सरी शिंपण करत आहे. आज (ता. १७) कोकण, घाटमाथ्यावर संततधार पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार सरींचा इशारा देण्यात आला आहे. पश्‍चिम विदर्भात जोरदार, उर्वरित विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे असून, तो पुढील चार ते पाच दिवस दक्षिणेकडेच राहणार आहे. मॉन्सूनचा आस राजस्थानच्या जैसलमेरपासून कोटा, रायसेन, कमी दाब क्षेत्राचे केंद्र, गोपालरपूर ते मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय होते. दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा आणि महाराष्ट्राच्या मध्य भागातून पूर्व-पश्‍चिम वाहणाऱ्या परस्परविरोधी वाऱ्यांचे जोड क्षेत्र कायम होते.

मंगळवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाची संततधार पाऊस सुरू होता. काही ठिकाणी १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. सिंधुदुर्गतील देवगड येथे उच्चांकी १६७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. राज्याच्या विविध भागांत हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली.

आज (ता. १७) पावसाला पोषक हवामान असल्याने कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ‘ऑरेंज’ अलर्ट देण्यात आला आहे. तर उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि पश्‍चिम विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरित विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज आहे.

विदर्भ परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र

सोमवारी (ता. १५) बंगालच्या उपसागरात दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर आले आहे. मंगळवारी (ता. १६) ही प्रणाली दक्षिण छत्तीसगड आणि विदर्भ परिसरावर होती. या प्रणालीला लागूनच समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. शुक्रवारपर्यंत (ता. १९) पुन्हा नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता आहे.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, ठाणे, मुंबई, पुणे, कोल्हापूर, बुलडाणा, वाशीम.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT