Rain Alert  Agrowon
हवामान

Rain Alert : राज्यात हलक्या पावसाची शक्यता

Rain Forecast : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढल्याने पूर्व भारतात पावसाने जोर धरला आहे.

Team Agrowon

Pune News : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढल्याने पूर्व भारतात पावसाने जोर धरला आहे. राज्यातही पावसाला पोषक हवामान होत असून, कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. १६) राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पश्‍चिम बंगाल आणि परिसरावर वादळी प्रणाली (डीप डिप्रेशन) सक्रिय आहे. रविवारी (ता. १५) ही प्रणाली कोलकात्यापासून ६० किलोमीटर पश्‍चिमेकडे, बंकुरापासून ११० किलोमीटर आग्नेयेकडे, झारखंडच्या जमशेदपूरपासून १७० किलोमीटर, तर रांचीपासून ३४० किलोमीटर पूर्वेकडे होती.

ही प्रणाली झारखंड, छत्तीसगडकडे येण्याची शक्यता आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा फिरोजपूरपासून, पतियाळा, शाहजहानपूर, बलिया, वादळी प्रणालीचे केंद्र (डीप डिप्रेशन) ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय होते.

पावसाच्या उघडिपीनंतर कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे. रविवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जेऊर येथे राज्यातील उच्चांकी ३४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

अनेक ठिकाणी तापमान ३१ अंशांच्या पुढे गेले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान होत असून, आज (ता. १६) राज्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे. उद्यापासून (ता. १७) तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

Delhi University Election: शितावरून भाताची परीक्षा

Maharashtra Drought Situation: दुष्काळदाहातील बेपर्वाई

Sangli APMC: सांगली बाजार समिती त्रिभाजनासाठी मुदतवाढ

SCROLL FOR NEXT