Rain Update  Agrowon
हवामान

Rain In Maharashtra : राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता; उन्हाचा चटका वाढला

Rain Forecast : मागील आठवड्यापासून राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर ओसरला आहे. राज्यात पुढील पाच दिवस पाऊस उघडीप देण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

Dhananjay Sanap

Pune News : मागील आठवड्यापासून राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर ओसरला आहे. राज्यात पुढील पाच दिवस पाऊस उघडीप देण्याचा अंदाज हवामानशास्त्र  विभागाने वर्तवला आहे. तर आज राज्यातील काही भागात हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता हवामानशस्त्र विभागाने वर्तवली आहे. तर उन्हाचा चटकाही काहसा वाढला आहे. 

राज्यात आज पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजी नगर, जालना जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.

तर बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारपर्यंत बहुतांश भागात पाऊस उघडीप देण्याची शक्यता आहे. तसेच शनिवारी मात्र मराठवाड्यातील नांदेड, लातूर. धाराशिव, तसेच मध्यमहाराष्ट्रातील सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

राज्यात पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा चटका काहीसा जाणवू लागला आहे. शेती कामांनाही वेग आला आहे. बहुतांश भागात खुरपणी फवारणीची कामे शेतकरी करत आहेत. मागील आठवडाभर राज्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावली होती.

तर काही भागात ढगाळ वातावरण होतं. त्यामुळं पिकांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव झाला. परंतु आता पावसानं उघडीप दिल्यानं शेती कामांना वेग आला आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होण्यास सुरुवात, जयकुमार गोरेंची माहिती

Nagpur Agriculture : नागपुरात कृषी विभागाचा कारभार रामभरोसे; पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक!

Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!

November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?

Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

SCROLL FOR NEXT