Rain Update Agrowon
हवामान

Rain Update : कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार शक्य

Weather News : रायगडसह पुणे, साताऱ्याच्या घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम विदर्भात वाढणार जोर

Team Agrowon

Rain Forecasting : पुणे : कमी दाब क्षेत्रामुळे मॉन्सून सक्रिय झाल्याने राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. आज (ता. २५) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात जोरदार पावसाचा इशारा आहे. रायगड जिल्ह्यासह पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर अतिदक्षतेचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित तुरळक ठिकाणी विजांसह मध्यम ते जोरदार सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
वायव्य झारखंड आणि परिसरावर ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, ही प्रणाली मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात राज्याकडे येण्याची शक्यता आहे. उत्तर बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थितीमुळे उद्यापर्यंत (ता. २६) नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता आहे.

मॉन्सूनचा आस राजस्थानच्या जैसलमेरपासून, कोटा, खजुराहो, कमी दाबाचे केंद्र, रांची ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. गुजरातपासून महाराष्ट्राच्या किनाऱ्याला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.
शनिवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे उच्चांकी ३४.६ अंश तापमानाची नोंद झाली. पावसाने हजेरी लावलेल्या भागात तापमानाचा पारा ३० अंशांच्या खाली घसरला आहे. ढगाळ हवामानामुळे उकाडा देखील जाणवत आहे. राज्यात अनेक ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. २५) राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

कोकणातील रायगडसह पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्याने अति दक्षतेचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, जळगाव, नाशिक या जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. उर्वरित कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह पावसाच्या हलक्या ते जोरदार सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.


मुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) :
रायगड, पुणे, सातारा.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :
पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, जळगाव, नाशिक.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
मुंबई, सिंधुदुर्ग, नंदूरबार, धुळे, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलडाणा, अकोला.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
अमरावती, वाशीम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT