Weather Update  Agrowon
हवामान

Weather Update : कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता

Monsoon Rain : कोकणासह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे.

अमोल कुटे

Pune News : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) राज्य व्यापले असून, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात ढगांची दाटी झाली आहे. आज (ता. २४) कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार आहे. कोकणासह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. राज्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

रविवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये घाटमाथ्यावरील ताम्हिणी, डुंगरवाडी, आंबोणे येथे मुसळधार पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंद झाली. ताम्हिणी येथे राज्यातील सर्वाधिक १२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोकणात पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींनी हजेरी लावली.

महाराष्ट्रापासून केरळपर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. रविवारी (ता. २३) राज्यात ढगाळ हवामान होते. सकाळपासूनच उकाडा देखील प्रचंड वाढला होता. दुपारनंतर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाला सुरवात झाली होती.

ढगाळ हवामान, पावसाच्या हजेरीने कमाल तापमान ३६ अंशांच्या खाली आहे. रविवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये वाशीम येथे राज्यातील उच्चांकी ३५.८ अंश तापमानाची नोंद झाली.

कोकण आणि घाटमाथ्यावर आज (ता. २४) पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडसह सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) तर पुणे जिल्ह्याचा घाटमाथा, पालघर, अमरावती आणि अकोला जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर.

जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) :

पालघर, पुणे, अकोला, अमरावती.

वादळी पावसाचा इशारा (यलो अलर्ट) :

ठाणे, मुंबई, नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, बुलडाणा, वाशीम, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT