Rain Alert Agrowon
हवामान

Rain Alert : कोकण, घाटमाथा, विदर्भात पाऊस जोर धरण्याची शक्यता

Rain Update : राज्यात गेले काही दिवस ओसरलेला पावसाचा जोर पुन्हा वाढण्याचे संकेत आहेत. आज (ता. ३१) कोकण घाटमाथा आणि पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.

Team Agrowon

Weather News : पुणे : राज्यात गेले काही दिवस ओसरलेला पावसाचा जोर पुन्हा वाढण्याचे संकेत आहेत. आज (ता. ३१) कोकण घाटमाथा आणि पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असून, उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

झारखंड आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ३.१ ते ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. अरबी समुद्रात सौराष्ट्र लगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या जैसलमेर, अजमेर, ग्वालिअर, चूरक, बालासोर, ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत आहे. दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, महाराष्ट्राच्या मध्य भागात पूर्व-पश्चिम वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोड क्षेत्र निवळले आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोकण, घाटमाथ्यासह राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली. मंगळवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये घाटमाथ्यावर काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. ताम्हिणी येथे उच्चांकी २०५ मिलिमीटर, दावडी येथे १८२ मिलिमीटर, माथेरान येथे १६० मिलिमीटर पाऊस झाला. तसेच शिरगाव, आंबोणे, डुंगरवाडी, भिरा, खोपोली, मंडणगड, लोणावळा, महाबळेश्वर येथे १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.

कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथा आणि विदर्भात मॉन्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. आज (ता. ३१) कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्यांचा घाटमाथा आणि पूर्व विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा ‘येलो’ अलर्ट आहे. विदर्भात विजांसह पावसाची, तर उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह पावसाच्या हलक्या शक्यता आहे. उद्यापासून (ता. १) कोकण, घाटमाथ्यासह, विदर्भात पाऊस पुन्हा जोर धरण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, चंद्रपूर, गडचिरोली.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update: उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता; राज्यातील काही भागात शुक्रवारी आणि शनिवारी पावसाचा अंदाज

Khandesh Rain Damage: खानदेशात पावसाने १८ हजार हेक्टरला फटका

Maize Procurement Issue: बाजारात मका दर हमीभावापेक्षा कमी

Farm Subsidy Delayed: कृषी यांत्रिकीकरणाच्या अनुदानाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

Mango Crop Compensation: आंबा उत्पादकांना नुकसान भरपाई मंजूर करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT