Monsoon Rain : वारणा धरण क्षेत्रात सलग पाचव्या दिवशी अतिवृष्टी

Rain Update : वारणा धरण पाणलोट क्षेत्रात सलग पाचव्या दिवशी अतिवष्टी झाली असून चोवीस तासांत १७२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
Monsoon Rain
Monsoon Rain Agrowon
Published on
Updated on

Sangli News : वारणा धरण पाणलोट क्षेत्रात सलग पाचव्या दिवशी अतिवष्टी झाली असून चोवीस तासांत १७२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे वारणा धरणातून गुरुवारी (ता. २५) दुपारी १० हजार ४६० क्युकेसने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.

शिराळा तालुक्यात संततधार पाऊस सुरू असून वारणा धरण पाणलोट क्षेत्रात सलग पाचव्या दिवशी अतिवृष्टी झाली. त्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढली आहे. धरणात १६७०६ क्युसेक प्रतिसेंकद पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरण व्यवस्थापनाने धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी (ता. २५) वक्रद्वारातून ६६६६ क्युसेक तर विद्युत जनित्राद्वारे १६५८ असा एकूण १० हजार ४६० क्युसेकने विसर्ग सुरू केला आहे. यामुळे वारणा नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा दिला आहे.

Monsoon Rain
Monsoon Rain : धो-धो कोसळधारांनी पुण्यात दाणादाण

शिराळा तालुक्यातून शाहूवाडी तालुक्याला जाणाऱ्या चरण, सोंडोली, शित्तूर या तीन मार्गावरील पूल पाण्याखाली गेले आहेत. शाहूवाडी तालुक्यातील सुमारे १७ गावे ही शिराळा तालुक्यातील आरळा बाजारपेठेशी जोडली आहेत. त्यामुळे या १७ गावांचा संपर्क तुटला आहे.

Monsoon Rain
Maharashtra Rain : मध्य महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ

वारणा धरणातून बुधवारी (ता. २४) ८८७४ क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला होता. मात्र, अतिवृष्टी होत असल्याने धरणात पाण्याची आवक वाढू लागली आहे. त्यामुळे गुरुवारी (ता. २५) धरणातून १५८६ क्युसेकने विसर्ग वाढवून तो १० हजार ४६० क्युसेक केला आहे. वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले असून तालुक्यातील शेती पाण्याखाली गेली आहे.

पलूस ते सांगलीमार्गे वाहतूक सुरू

सांगली विभाग पलूस आगार आमनापूर ते अंकलखोपमध्ये असणाऱ्या कृष्णा नदीच्या पुलाजवळ पाणी आल्याने या मार्गे जाणारी वाहतूक बंद केली आहे. पलूस मार्गे इस्लामपूर अशी पर्याही वाहतूक सुरू केली आहे. पलूस ते सांगलीमार्गे वाहतूक सुरू आहे. शिराळा आगारातून आरळा-शित्तूर पुलावर पाणी आल्याने कांडवन गावात जाणारा मुक्काम व फेऱ्या मणदूर मार्गे सोडण्यात येत आहेत. शिराळा तालुक्यातील इतर ठिकाणची वाहतूक सुरळीत सुरू आहे, अशी माहिती महामंडाळाच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com