Monsoon Update
Monsoon Update Agrowon
हवामान

Monsoon Update : यंदा मॉन्सूनचे आगमन लांबण्याची शक्यता

Team Agrowon

Latest Weather Update : एल-निनोच्या सावटामुळे यंदाच्या मॉन्सून पावसाविषयी साधक-बाधक चर्चा सुरू असतानाच, नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) यंदा तीन दिवस उशीराने होण्याची शक्यता आहे.

४ जून रोजी देशाचे प्रवेशद्वार असणाऱ्या केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. या अंदाजानुसार मॉन्सूनचे आगमन चार दिवस मागे-पुढे होण्याची शक्यताही गृहीत धरण्यात आल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

दीर्घकालीन आगमनाच्या वेळा लक्षात घेता साधारणत: मॉन्सून साधारणत: १ जून पर्यंत केरळमध्ये पोचतो. यात मॉन्सूनचे आगमन सात दिवस आधी किंवा उशीराने होऊ शकते. गतवर्षी मॉन्सूनचे आगमन तीन दिवस आधी म्हणजेच २९ मे रोजी झाले होते. यंदा तो तीन दिवस उशीराने केरळमध्ये धडकण्याची शक्यता आहे.

वायव्य भारतातील किमान तापमान, दक्षिण द्वीपकल्पावरील पूर्वमोसमी पावसाचे प्रमाण, चीनच्या दक्षिण समुद्रातून होणारा किरणोत्सर्ग, आग्नेय हिंद महासागरात खालच्या थरात वाहणारे वारे, वायव्य प्रशांत महासागरातील समुद्र सपाटीलगतचा हवेचा दाब, ईशान्य हिंद महासागरात वरच्या थरात वाहणारे वारे हे सहा घटक हा अंदाज तयार करताना विचारात घेतले जातात.

यंदा नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा ९६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) ११ एप्रिल रोजी जाहीर केला. या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक पाऊस पडण्याची शक्‍यताही गृहीत धरण्यात आली आहे.

मॉन्सून हंगामात एल-निनो स्थिती राहण्याची शक्यता असून, इंडियन ओशन डायपोल (आयओडी) धनात्मक (पॉझिटीव्ह) राहण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या अखेरीस मॉन्सून हंगामातील पावसाचा सुधारीत दीर्घकालीन अंदाज व विभागानिहाय पावसाचे वितरण स्पष्ट होणार आहे.

मॉन्सूनच्या केरळातील आगमन

वर्ष---आगमनाचा अंदाज---प्रत्यक्ष आगमन

२०१८---२९ मे---२९ मे

२०१९---६ जून---८ जून

२०२०---५ जून---१ जून

२०२१---३१ मे---३ जून

२०२२---२७ मे---२९ मे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

Bribe Arrest : निलंबन रद्द करण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

SCROLL FOR NEXT