Yavatmal News: ‘पांढऱ्या सोन्याचा टापू’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वणी तालुक्यात यंदा अतिवृष्टीमुळे कापसाच्या उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. परिणामी, डिसेंबरअखेरपर्यंत होणारी कापूस खरेदी मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल सव्वा लाख क्विंटलने घटल्याचे चित्र आहे..मागील हंगामात डिसेंबरअखेरपर्यंत भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) १ लाख २८ हजार ६०४ क्विंटल कापूस खरेदी केला होता. संपूर्ण हंगामात ही खरेदी जवळपास ५ लाख क्विंटलपर्यंत पोहोचली होती. यंदा मात्र सीसीआयकडून खरेदीला उशिरा सुरुवात झाली असून उत्पादन घटल्याने अपेक्षित आवक होताना दिसत नसल्याचे चित्र आहे..Cotton Procurement: विदर्भातील शेतकऱ्यांकडून किती कापूस खरेदी केला गेला?.कृषी उत्पन्न बाजार समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या वणीतील १२ जिनिंग, तसेच शिंदोला व नवरगाव येथील जिनिंगमध्ये सीसीआयकडून कापूस खरेदी सुरू आहे. सुरुवातीला चांगल्या प्रतीच्या कापसाला ८,११० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. मात्र प्रतवारीनुसार हा दर आता ६,०६० रुपयांपर्यंत घसरला आहे. प्रत्येक गाडीतील कापसाची सीसीआयच्या ग्रेडरमार्फत तपासणी करूनच दर निश्चित केला जात आहे..यावर्षी शेतकऱ्यांचा कल वणी बाजारपेठेपेक्षा शिंदोला बाजाराकडे अधिक असल्याचे दिसून येत आहे. १८ डिसेंबरपर्यंत वणी येथे ९७,९०९ क्विंटल, शिंदोला येथे ६३,७४० क्विंटल, तर नवरगाव येथे ७,१८२ क्विंटल अशी एकूण १ लाख ६८ हजार ८३२ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. डिसेंबरअखेरपर्यंत ही खरेदी २ लाख क्विंटलपर्यंत पोहोचेल, असा अंदाज बाजार समितीने व्यक्त केला आहे. मात्र यंदा कापसाचे एकूण उत्पादनच कमी असल्याने संपूर्ण हंगामात जेमतेम ३ लाख क्विंटलपर्यंतच कापूस येण्याची शक्यता असून, मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास २ लाख क्विंटलची घट होण्याची चिन्हे आहेत..CCI Cotton Procurement: ‘सीसीआय’ची कापूस खरेदी साडेचार लाख क्विंटलवर.जिनिंगमध्ये चढाओढसीसीआयकडून वणीतील १२ जिनिंगमध्ये कापूस खरेदी होत असली, तरी कोणत्या जिनिंगमध्ये कापूस विकायचा, हा निर्णय शेतकऱ्यांनाच घ्यावा लागत आहे. यासाठी अॅपवर नोंदणी करून स्लॉट व जिनिंगची पसंती द्यावी लागते. त्यामुळे ‘आमच्या जिनिंगची निवड करा’ अशा जाहिराती जिनिंग मालकांकडून सुरू आहेत. काही ठिकाणी वाहनचालकांना प्रलोभने दिली जात असून, एका जिनिंगमालकाने चक्क सोडत पद्धतीने बक्षिसे जाहीर केल्याची चर्चा आहे. परिणामी,काही जिनिंग रिकाम्या, तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात कापसाचा साठा दिसून येत आहे..खासगी व्यापाऱ्यांकडून दरवाढउत्पादन कमी असल्याने यंदा कापसाला बाजारात चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. सीसीआयकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू असल्याने खासगी व्यापाऱ्यांना कापूस मिळत नव्हता. त्यामुळे व्यापाऱ्यांनीही दर वाढवले असून सध्या ७,५०० ते ७,६०० रुपये प्रतिक्विंटल दर दिला जात आहे. दरात आणखी २०० ते ३०० रुपयांची वाढ झाल्यास शेतकरी व्यापाऱ्यांकडे कापूस विकण्याची शक्यता वर्तविली जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.