Monsoon Update
Monsoon Update Agrowon
हवामान

Maharashtra Monsoon Update : मॉन्सूनच्या प्रवासास हवेचे दाब अनुकूल

 डॉ. रामचंद्र साबळे 

Weather Update : महाराष्ट्रावर १००८ हेप्टापास्कल, वायव्य भारतावर ९९८, मध्य भारतावर १००२ हेप्टापास्कल, बंगालच्या उपसागरावर पूर्व किनारपट्टीचे दिशेने १००० हेप्टापास्कल, तर हिंदी महासागरावर १०१२ हेप्टापास्कल इतके हवेचे दाब आठवडाअखेरपर्यंत राहण्याची शक्यता आहे.

हे हवेचे दाब मॉन्सूनच्या प्रवासासाठी अनुकूल बनले आहेत. त्यामुळे या आठवड्यात मॉन्सूनचा प्रवास विषुववृत्ताच्या दक्षिण भागातून हवेच्या कमी दाबाचे क्षेत्राचे दिशेने सुरू होईल.

सध्याच्या हवामान स्थितीनुसार मॉन्सून अंदमान समुद्रात निर्धारित वेळेत पोहोचण्याची शक्यता दिसून येत आहे. साधारणपणे अंदमानात मॉन्सून २० ते २१ मेपर्यंत पोहोचून तो आपला प्रवास या निर्धारित तारखेपर्यंत पूर्ण करेल, कदाचित त्यापूर्वीही पूर्ण करेल, अशी सध्या हवामान स्थिती आहे.

बंगालचे उपसागरावर आठवडाभर ९९४ ते ९९८ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहणार आहे. त्यानुसार मॉन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी हवामान घटक, हवेचे दाब अत्यंत अनुकूल राहतील. मॉन्सून वेळेपूर्वीही सर्व भागांत प्रगती करेल.

अरबी समुद्राचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअस, हिंदी महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअस आणि बंगालचे उपसागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३१.६ अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे इंडियन ओशन डायपोल पॉझिटिव्ह राहील. ही स्थिती सुरवातीचे काळात मॉन्सूनचा चांगला पाऊस होण्यास अनुकूल आहे.

तर प्रशांत महासागराचे विषुववृत्तीय भागातील पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअस राहण्यामुळे सध्यातरी एल-निनो तटस्थ राहणार आहे. या आठवड्यात वाऱ्याच्या वेगात वाढ होईल. विदर्भात वाऱ्याचा वेग ताशी २१ ते २८ कि.मी. राहण्याची शक्यता असल्याने जून महिन्यात मॉन्सून भारतात वेळेवर किंवा वेळेआधी दाखल होण्याची शक्यता आहे.

कोकण

कोकणात वाऱ्याची दिशा प्रामुख्याने नैर्ऋत्येकडून राहणार आहे. ही बाब मॉन्सूनच्या आगमनास अनुकूल आहे. वाऱ्याचा ताशी वेग सर्वसाधारणच राहील. कमाल तापमान ठाणे जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअस, तर रत्नागिरी, रायगड व पालघर जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील.

किमान तापमान ठाणे व पालघर जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस, रायगड जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस, तर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत २६ ते २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ८३ ते ९० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ५१ ते ५८ टक्के तर पालघर, ठाणे व रायगड जिल्ह्यांत ३० ते ४० टक्के राहील.

उत्तर महाराष्ट्र

सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील व ती मॉन्सूनचे आगमनासाठी योग्य आहे. वाऱ्याच्या ताशी वेगात वाढ होऊन सर्वच जिल्ह्यात ताशी २४ ते २६ किमी राहील. जेव्हा वाऱ्याचा ताशी वेग वाढतो, तेव्हा मॉन्सून पावसात सुरुवातीच्या काळात खंड नसतो.

कमाल तापमान नाशिक व जळगाव जिल्ह्यांत ४० ते ४१ अंश सेल्सिअस, तर धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत ४२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान धुळे व जळगाव जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस, तर नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस राहील.

आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नाशिक व धुळे जिल्ह्यांत ७० ते ७१ टक्के, तर नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ४० ते ५७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १३ ते १८ टक्के राहील.

मराठवाडा

कमाल तापमान औरंगाबाद जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस, जालना, बीड, लातूर जिल्ह्यात ४२ अंश सेल्सिअस, तर उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ४३ अंश सेल्सिअस राहील. या आठवड्यात उष्णतेच्या लाटा जाणवतील. किमान तापमान नांदेड जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस, तर परभणी व हिंगोली जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस राहील.

किमान तापमान जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस, तर लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता बीड व जालना जिल्ह्यांत ५२ टक्के, तर उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली व औरंगाबाद जिल्ह्यांत ४५ ते ४९ टक्के राहील.

सर्वच जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता १२ ते १६ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग वाढून ताशी २३ ते २७ कि. मी. राहील. यावरूनच मॉन्सून मराठवाड्यात लवकर दाखल असे दिसून येते. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.

पश्‍चिम विदर्भ

कमाल तापमान बुलडाणा जिल्ह्यात ४४ अंश सेल्सिअस, तर अकोला व अमरावती जिल्ह्यांत ४३ अंश सेल्सिअस आणि वाशीम जिल्ह्यात ४२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान वाशीम व अमरावती जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस, तर बुलडाणा जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. अकोला जिल्ह्यात ते २६ अंश सेल्सिअस राहील.

आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ४४ ते ४८ टक्के राहील. मात्र, बुलडाणा जिल्ह्यात ती ३७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ११ ते १५ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग २५ ते २८ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.

मध्य विदर्भ

कमाल तापमान नागपूर जिल्ह्यात ४५ अंश सेल्सिअस, यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत ४४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नागपूर जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस, तर वर्धा व यवतमाळ जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यात १० ते १३ टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग वाढेल. वारे ताशी २१ ते २५ किमी वेगाने वाहतील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.

पूर्व विदर्भ

कमाल तापमान भंडारा जिल्ह्यात ४५ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत ४४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गोंदिया जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस तर गडचिरोली जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर जिल्ह्यात ३१ टक्के, तर गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत २९ ते ३० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ८ ते ९ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे दुपारी हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ११ ते २१ किमीपर्यंत वाढेल. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.

पश्‍चिम महाराष्ट्र

वाऱ्याची दिशा पुणे जिल्ह्यात नैर्ऋत्येकडून तर कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर व नगर जिल्ह्यांत वायव्येकडून राहील. कमाल तापमान नगर व सोलापूर जिल्ह्यांत ४३ अंश सेल्सिअस, तर सातारा व सांगली जिल्ह्यात ४२ अंश सेल्सिअस आणि कोल्हापूर जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस राहील.

कमाल तापमान कोल्हापूर जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस, सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस, नगर जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस, तर सोलापूर जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ८७ टक्के, सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यांत ७० टक्के आणि नगर जिल्ह्यात ६० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ४४ टक्के तर सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यांत २४ ते २८ टक्के व नगर जिल्ह्यात १६ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग सांगली, सातारा, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत ताशी २१ ते २६ किमी राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.

कृषी सल्ला

- खरीप हंगामाची पूर्वतयारी करावी. पीकपद्धतीनुसार बियाणे व खतांची उपलब्धता करावी.

- खरीप पिकांसाठी जमीन तयार करून शेतातील काडीकचरा, पिकांचे अवशेष गोळा स्वच्छता करावी.

- ठिबक संचाचा कालावधी वाढवावा.

- जनावरांना गोठ्यातच पुरेसे मुबलक पाणी उपलब्ध करावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT