Climate Change Agrowon
हवामान

Climate Change : हवामान बदलानुसार नवीन पीक पद्धतीचा अवलंब आवश्यक

नविन तंत्रज्ञानाचा अवलंब करून ज्यामध्ये सिंचन व खत व्यवस्थापन केल्यास कांदा व मका पिकात उत्पादनवाढ व त्यातून उत्पन्नवाढ शक्य आहे.

Team Agrowon

Nashik News : नैसर्गिक आपत्तीच्या संकटात शेतीक्षेत्राचे मोठे नुकसान होत आहे. तुलनेत अधिक उत्पादन खर्च असलेल्या पिकांचा पर्याय अडचणीचा ठरत आहे.

त्यामुळे नविन तंत्रज्ञानाचा अवलंब करून ज्यामध्ये सिंचन व खत व्यवस्थापन केल्यास कांदा व मका पिकात उत्पादनवाढ व त्यातून उत्पन्नवाढ शक्य आहे.

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टिकायचे असेल तर नविन तंत्रज्ञान आत्मसात करावे. हवामान बदलानुसार पीक पद्धती निवडावी, असे मत जैन इरिगेशनचे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. बी. डी. जडे यांनी मांडले.

लोकनेते दत्ताजी पाटील प्रतिष्ठान तर्फे ‘आधुनिक तंत्रज्ञानाने मका व कांदा पीक उत्पादन वाढ’ या विषयावर शेतकरी परिसंवाद व शिवारफेरीचे आयोजन लासलगांव (ता. निफाड) येथे नानासाहेब दत्ताजी पाटील व संजय दत्ताजी पाटील यांच्या शेतावर करण्यात आले होते.

यावेळी शेतकरी परिसंवाद कार्यक्रमात डॉ. जडे बोलत होते. यावेळी प्रतिष्ठानचे प्रमुख व नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील, लोकनेते दत्ताजी पाटील बँकेचे तज्ञ संचालक शंतनू पाटील, प्रगतशील शेतकरी शिवाजीराव ढेपले, मंडळ कृषी अधिकारी श्री.सोमवंशी, लहानू मेमाने उपस्थित होते.

डॉ.जडे म्हणाले, की अमेरिकेत मका उत्पादन २०० क्विंटलवर आहे. तुलनेत भारताची उत्पादकता कमी आहे. मातीची सुपीकता, संतुलित अन्नद्रव्य, सिंचन व खत व्यवस्थापन, बीजप्रक्रिया या लागवडीतील अंतर योग्य राखल्याने उत्पादनवाढ शक्य होत आहे. त्यामुळे ठिबक सिंचन हा त्यावरील योग्य पर्याय आहे. असेही ते म्हणाले.

नवीन तंत्रज्ञान अंगीकारून नियोजन फायद्याचे...

नैसर्गिक आपत्तीच्या (Natural Calamities) पार्श्वभूमीवर कांदा व मका या पिकाचे अर्थकारण समजून घेणे गरजेचे आहे. त्यानुसार नवीन तंत्रज्ञान अंगीकारून ठिबक सिंचनाच्या माध्यमातूनच आगामी काळात नियोजन फायद्याचे ठरणार आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी शेती करावी, असे आवाहन नानासाहेब पाटील यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Supply Schemes Issue: निधीअभावी जलजीवन मिशनच्या ६८ पाणीपुरवठा योजना रखडल्या

Cotton Farming Techniques: हेक्टरी १२ ते १४ क्विंटल कापूस उत्पादनाचे उद्दिष्ट; शास्त्रीय तंत्रज्ञानाचा अवलंब करा

Farmer Loan Waiver: नांदेडमध्ये एक लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्ती

PM Kisan 24th Installment: शेतकऱ्यांना दिवाळीआधी २ हजार मिळणार; 'पीएम किसान'च्या २४ व्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर

Food Conservation: अन्नाची बचत हीच अन्ननिर्मिती; अन्न-पाण्याची नासाडी टाळा : डॉ. इंद्र मणी मिश्रा

SCROLL FOR NEXT