Weather Update Agrowon
हवामान

Weather Update : तापमानात वाढ शक्य

Weather News : ढगाळ हवामान, उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे. गेली काही दिवसांपासून दुपारच्या वेळी उन्हाच्या झळा वाढल्या आहेत.

अमोल कुटे

Pune News : राज्यात अंशतः ढगाळ हवामान, उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे. गेली काही दिवसांपासून दुपारच्या वेळी उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. घराबाहेर पडणे तापदायक ठरत आहे. आज (ता. १८) राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा, तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

उत्तर भारतात किमान तापमानात वाढ होत असून, हरियानाच्या हिस्सार येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ६.० अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. दक्षिण गुजरात, कोकण गोवा ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे राज्यात अंशतः ढगाळ हवामान होत आहे.

शनिवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासात सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. कमाल तापमानात वाढ होत असून, अनेक ठिकाणी कमाल तापमान ३४ अंशांच्या पुढे गेले आहे. राज्यात किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी नाहीशी झाली आहे. आज (ता. १८) उन्हाचा चटका, उकाडा आणि तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे.

शनिवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३४.६ (१४.६), नगर ३२.८ (१४.४), धुळे ३४.० (१४.५), जळगाव ३३.८ (१८), कोल्हापूर ३४.३ (१८.५), महाबळेश्वर २८.४ (१७.६), मालेगाव ३५.२ (१६.८), नाशिक - (१६.८), निफाड ३१.४ (१४), सांगली ३४.५ (१७.८), सातारा ३४.५ (१५.४), सोलापूर ३६ (१९.१), सांताक्रूझ ३४.४ (२२), डहाणू ३२.८ (२१.१), रत्नागिरी ३५ (२०.१),

छत्रपती संभाजीनगर ३२.५ (१८.५), नांदेड ३३.६ (१९.२), परभणी ३४.१ (१६.६), अकोला ३४.८ (१७.४), अमरावती ३३.४ (१९.३), बुलडाणा ३३.४ (१९.०), ब्रह्मपुरी ३५.३ (२०.२), चंद्रपूर ३३.६ (१६.६), गडचिरोली ३२.४ (१६.२), गोंदिया ३२.२ (१८.२), नागपूर ३२.१(१९.६), वर्धा ३४ (१९.४), वाशीम - (१५.६), यवतमाळ ३४.७ (१५.५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gram Sowing : खानदेशात हरभरा पेरा स्थिर राहण्याचे संकेत

BBF Technology : बीबीएफ तंत्रज्ञान उपयुक्त : डॉ. मायी

Crop Subsidy : कोरडवाहू पिकांसाठी हेक्टरी ३० हजार, बागायतीसाठी ७० हजार रुपये अनुदान द्या

Farmer Crisis : करपलेल्या ४० एकर सोयाबीनवर फिरवला नांगर

Sugarcane Crushing Season: दुष्काळात उसासाठी कारखान्यांची चढाओढ

SCROLL FOR NEXT