Kharip crop  Agrowon
हवामान

Monsoon 2023: पाऊस उघडला; काही ठिकाणी हलक्या सरी

Maharashtra Rain Alert : राज्याच्या काही भागांमध्ये आज दुपारी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडल्या. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला.

Team Agrowon

IMD Forecast : राज्याच्या अनेक भागात माॅन्सूनच्या पावसाने उघडीप दिली. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. हवामान विभागाने आज राज्याच्या काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजही व्यक्त केला.

मध्य प्रदेश आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, त्यालगत समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा त्याच्या सर्वसाधारण स्थितीच्या उत्तरेकडे सरकला आहे. मॉन्सूनचा आस पंजाबच्या भटिंडा पासून जिंद, मेरठ, हार्दोई कमी दाबाचे केंद्र, शांतीनिकेतन, मिझोराम पर्यंत विस्तारला आहे.

राज्याच्या काही भागांमध्ये आज दुपारी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडल्या. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. तर विदर्भातील वर्धा नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

कोकणात अनेक ठिकाणी आज हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर राज्यातील इतर भागात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज आहे. तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Alert: मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाची शक्यता

Rain Crop Damage: पावसामुळे १४९० हेक्टरला फटका

Milk Regulation: उत्पादक, विक्रेत्यांना नोंदणी बंधनकारक

Unseasonal Rain Impact: पूर्वमोसमी पावसाचा दणका सुरूच

Pesticide Price Increase : कीटकनाशकांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता; पश्चिम आशियातील तणावामुळे पुरवठा विस्कळीत

SCROLL FOR NEXT