
Parbhani News : यावर्षीच्या (२०२३)खरीप हंगामात परभणी जिल्ह्यात विविध पिकांच्या ६५ हजार ६१६ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा झाला. सोमवार (ता. १७) पर्यंत एकूण सुमारे ५३ हजार क्विंटल बियाण्यांची विक्री झाली. त्यात महाबीजच्या ६ हजार ६८२ क्विंटल व खाजगी कंपन्यांच्या ४६ हजार ६३३ क्विंटल बियाणे आहे.
कपाशी बियाण्याच्या ९ लाख १३ हजार ६८४ पाकिटांची विक्री झाली, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी दीपक सामाले यांनी दिली. जिल्ह्यात यंदा सोयाबीनची २ लाख ५० हजार हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. त्यासाठी ग्रामबिजोत्पादन कार्यक्रम व शेतकऱ्यांकडील घरचे वगळून उर्वरित ६५ हजार ६२५ क्विंटल बियाण्याची मागणी बियाणे उत्पादक कंपन्यांकडे करण्यात आली.
त्यात महाबीजकडे २० हजार क्विंटल, राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडे ५ हजार क्विंटल, खाजगी कंपन्याकडील ४० हजार ६२५ क्विंटल बियाण्याचा समावेश होता. महाबीजकडून ७ हजार ५३५ क्विंटल व खाजगी कंपन्याकडून ५१ हजार २५० क्विंटल मिळूनएकूण ५८ हजार ७८५ क्विंटल बियाण्याचा पुरवठा झाला. त्यापैकी महाबीजच्या ६ हजार ५८८ क्विंटल व खाजगी कंपन्यांच्या ४१ हजार १५० क्विंटल मिळून एकूण ४७ हजार ७३८ क्विंटल बियाण्याची विक्री झाली.
यंदा तुरीचे १ हजार ४५६ क्विटंल, मुगाचे ३२३ क्विंटल, उडदाचे २०९ क्विंटल, ज्वारीचे ७८ क्विंटल, बाजरीचे ७ क्विंटल, मक्याचे १५ क्विंटल, तिळाचे २ क्विंटल असे एकूण २ हजार ९० क्विंटल बियाण्याचा पुरवठा महाबीज व खाजगी कंपन्यांकडून झाला. त्यापैकी तुरीचे ९६८ क्विंटल,मुगाचे १०६ क्विंटल, उडदाचे ११९ क्विंटल, तीळाचे १ क्विंटल, ज्वारीचे ३२ क्विंटल, बाजरीचे ५ क्विंटल, मक्याचे ६ क्विंटल असे एकूण १ हजार २३७ क्विंटल बियाण्याची विक्री झाली.
यंदाच्या कपाशीच्या प्रस्तावित १ लाख ९५ हजार हेक्टर क्षेत्रानुसार बी. टी. कपाशी बियाण्याच्या १० लाख ७२ हजार ५०० पाकिटांची मागणी बियाणे उत्पादक कंपन्यांकडे करण्यात आली. त्यापैकी १० लाख १५ हजार पाकिटांचा पुरवठा झाला. सोमवार(ता. १७) अखेर ९ लाख १३ हजार ६८४ बियाणे पाकिटाची (४ हजार ३४० क्विंटल ) विक्री झाली, असे सामाले यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.