Nirmala Sitharaman Agrowon
Video

Nirmala Sitharaman: अर्थसंकल्पात उल्लेख नसलेली पीएम किसान योजना बंद होणार?

Loksabha Election: लोकसभा निवडणुकांच्या आधी अंतरिम अर्थसंकल्पातही या योजनेच्या लाभार्थीवर जोर देण्यात आला होता. खरं म्हणजे २०१९ साली लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून योजना सुरू केल्याचं जाणकार सांगतात.

Team Agrowon

Budget 2024: अर्थसंकल्पात पीएम किसान योजनेचा उल्लेख केला नसला तरी पीएम किसान योजनेसाठी मात्र गेल्या वर्षीइतकीच म्हणजे ६० हजार कोटी रूपयांची तरतूद प्रस्तावित आहे. तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी गेल्या वर्षीप्रमाणेच ८६ हजार कोटी रूपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांनी मनरेगा बंद होणार, पीएम किसान बंद होणार या अफवांवर विश्वास ठेऊ नये. एकमात्र खरं की, केंद्र सरकार उठता बसता ज्या पीएम किसान योजनेचा नामजप करतं, त्याचा अर्थसंकल्पात साधा उल्लेख केलेला नाही. त्यावरून केंद्र सरकारचा लाभार्थी योजनांवरचा फोकस पुढील काळात कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जाऊ लागलीय. नीती आयोगाकडून सुरू असलेलं पीएम किसान योजनेचं मूल्यांकन २९ जुलै रोजी पूर्ण होणार आहे. त्यानंतर केंद्र सरकारला नीती आयोग काय सूचना करतं, ते पाहावं लागेल. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT