Soybean Agrowon
Video

Soybean: सोयाबीन-कापूस अनुदान खात्यात कधी जमा होणार ?

Cotton: २१ ऑगस्टपासून सोयाबीन-कापूस अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पण यातलं खरं काय आणि नेमकी वस्तुस्थिती काय आहे याची माहिती आम्ही राज्य कृषी विभागाकडून घेतली आहे.

Team Agrowon

Cotton Soybean Madat: सोयाबीन-कापूस अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार, या योजनेसाठी किती शेतकरी पात्र ठरलेत याबद्दलची माहिती या व्हिडिओतून घेणार आहोत. तर या योजनेच्या अंमलबजावणीबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमय. राज्य सरकारने २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ५ हजार रुपये किमान दोन हेक्टरच्या मर्यादेत अनुदान देण्याची घोषणा केली. एका शेतकऱ्याला २ हेक्टरसाठी जास्तीत जास्त १० हजार रुपये तर २० गुंठयापेक्षा कमी क्षेत्र असेल तर सरसकट १ हजार रुपये मिळणार आहेत. त्यामध्ये पात्र शेतकरी कोण असणार तर ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी अॅप किंवा पोर्टलवर नोंदणी केली, असे शेतकरी पात्र ठरणार आहेत. पात्र शेतकऱ्यांची माहिती घेण्यासाठी राज्य सरकारनं आधारच्या माहितीचा वापर करण्यासाठी संमती पत्र शेतकऱ्यांकडून भरून घेण्याचं ठरवलेलंय. त्यामुळं आधारवरील माहिती वापरण्यासंबंधीचं संमती पत्र शेतकऱ्यांना कृषी सहाय्यकाकडे भरून द्यायचं आहे. तर दुसरं म्हणजे सामायिक खातेदारांना एक ना हरकत पत्र भरून द्यायचं आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payments Pending: ऊस बिले द्या, अन्यथा जलसमाधि

Farmer Loan Waiver : २०१७ आणि २०१९ च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी निर्णय

Drinking Water Storage: तेरा प्रकल्पांतील साठा पिण्यासाठी आरक्षित

Tur Seeds Procurement: तेलंगणातील शेतकरी तूरीच्या बियाणे खरेदीसाठी करमाळ्यात

Agrowon Podcast: आल्याचा भाव टिकून; सोयाबीन टिकून, गहू आवक घटली, तर कापूस व कारले स्थिरावले

SCROLL FOR NEXT