Jowar market rate agrowon
Video

Wheat Rate: गव्हाचे भाव टिकून; तसेच काय आहेत ज्वारी, बटाटा, ढोबळी मिरची आणि गाजराचे आजचे बाजारभाव?

Market Rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण ज्वारी, बटाटा, ढोबळी मिरची, गाजर आणि गहू बाजाराची माहिती घेणार आहोत.

Team Agrowon

Jowar Price: ज्वारीचे दर मागील दीड महिन्यात क्विंटलमागे किमान ३०० ते ५०० रुपयांनी कमी झाले आहेत. बाजारातील ज्वारीची आवक वाढत आहे. सध्या ज्वारी वाण आणि गुणवत्तेप्रमाणे २३०० ते ३१०० रुपयांच्या दरम्यान विकली जात आहे. देशातील बटाटा उत्पादन यंदा वाढले आहे. सध्या बाजारात बटाट्याला प्रतिक्विंटल सरासरी १ हजार ५०० ते १ हजार ७०० रुपयांचा भाव मिळत आहे. बाजारात ढोबळी मिरचीची आवक स्थिरावलेली दिसत आहे. सध्या ढोबळ्या मिरचीला प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. गाजराला बाजारात चांगला उठाव आहे. तसेच गाजराची आवकही चांगली सुरु आहे. त्यामुळे सध्या गाजराला प्रतिक्विंटल सरासरी १२०० ते १५०० रुपयांचा भाव मिळत आहे. बाजारात सध्या गव्हाची आवक चांगली सुरु आहे. सध्या गहू २ हजार ५०० ते २ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT