paddy subsidy 20,000 per hectare agrowon
Video

Paddy Subsidy: धान उत्पादकांसाठी अनुदानाचा जीआर प्रसिद्ध, पण अटींचा अडथळा

खरीप पणन हंगाम २०२४-२५ मधील किमान आधारभूत किंमत खरेदी म्हणजेच हमीभाव योजनेंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून प्रति हेक्टरी २० हजार रुपये अनुदान दोन हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येणार आहे. त्यामुळे धान उत्पादकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धानाची विक्री केलेली असो वा नसो धान लागवडीखालील जमीनधारणेनुसार प्रतिहेक्टरी २० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने १ हजार ८०० कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय राज्य सरकारने बुधवारी (ता.२६) प्रसिद्ध केला.

Team Agrowon

खरीप पणन हंगाम २०२४-२५ मधील किमान आधारभूत किंमत खरेदी म्हणजेच हमीभाव योजनेंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून प्रति हेक्टरी २० हजार रुपये अनुदान दोन हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येणार आहे. त्यामुळे धान उत्पादकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. धान लागवडीखालील जमीनधारणेनुसार प्रतिहेक्टरी २० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने १ हजार ८०० कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय राज्य सरकारने बुधवारी (ता.२६) प्रसिद्ध केला. परंतु यामध्ये अटीशर्तीचा खोडा घालण्यात आल्याने बहुतांश धान उत्पादक शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. यामध्ये अनुदानासाठी हमीभाव खरेदी योजनेंतर्गत नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांपैकी धान लागवडीच्या क्षेत्राची ई-पीक पाहणी, ई-भूमी, महानोंदणी, पोर्टलवरील पाहणीची खातरजमा करण्यात येणार आहे. या पोर्टल नोंदणी असेल तरच शेतकरी अनुदानास पात्र ठरणार आहेत. वास्तविक राज्यात ई-पीक पाहणी अॅपमध्ये अद्यापही शेतकऱ्यांना अडचणी येतात. सर्व्हर आणि नेटवर्कच्या समस्या शेतकऱ्यांसमोर निर्माण होतात. त्यामुळे विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी पूर्ण होत नाही, असं शेतकरी सांगतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

leopard Captured: श्रीरामपूर, वीरगाव, निघोजमध्ये बिबट्या जेरबंद

Water Crisis: कऱ्हाडला पाण्यासाठी हवा ‘महामार्ग’चा हिरवा कंदील

VB G RAM G Act: तामिळनाडू विधानसभेत 'व्हीबी- जी राम जी' विरोधात ठराव मंजूर, 'मनरेगा'चे समर्थन

Agrowon Podcast: टोमॅटो भावात नरमाई; सोयाबीन टिकून, कापूस आवक कमीच, कारल्याला मागणी तर ज्वारी दर स्थिर

Local Body Elections: सांगली जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी बंडखोरी

SCROLL FOR NEXT