Ahilyanagar News: अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये बिबट्यांचा वावर वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. निघोज (ता. पारनेर), वीरगाव (ता. अकोले) आणि श्रीरामपूर येथील वेगवेगळ्या परिसरात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबटे जेरबंद झाले आहेत. गेल्या तीन महिन्यांत अहिल्यानगर जिल्ह्यात सुमारे २५ बिबटे पकडण्यात आले असून, तरीही बिबट्यांची धास्ती कायम आहे..पारनेर तालुक्यातील निघोज येथील लामखडे-वरखडे वस्ती परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या जेरबंद झाला. या भागात मागील महिनाभरापासून बिबट्यांचा वावर वाढला असून, कोंबड्या, शेळ्या आणि कालवडींवर हल्ल्याच्या घटना घडल्या होत्या. यामुळे नागरिकांचे दोन ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले..Elephant Capture Mission: हत्ती पकड मोहिमेसाठी दोडामार्गचे शेतकरी आक्रमक.जेरबंद झालेला बिबट्या अंदाजे दोन वर्षांचा असून, आणखी एक मोठा बिबट्या परिसरात मुक्त संचार करत असल्याने अधिक पिंजरे लावण्याची मागणी करण्यात आली आहे. अकोले तालुक्यातील वीरगाव शिवारातही वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या अडकला. वीरगाव, डोंगरगाव, हिवरगाव, देवठाण, पिंपळगाव निपाणी आणि गणोरे या आढळा मध्यम.Leopard Terror: जुन्नर वन विभागात ६८ बिबटे जेरबंद .प्रकल्प परिसरात बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी, शेतमजूर, महिला आणि विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण झाली होती. ऊसतोड हंगामामुळे नैसर्गिक लपण कमी झाल्याने बिबटे मानवी वस्तीकडे येत असल्याचे दिसून येत आहे..दरम्यान, श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्ती परिसरात पहाटे भक्ष्याच्या शोधात आलेला बिबट्या विशाल दुपाटी यांच्या घराजवळ लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. एकीकडे बिबटे पकडले जात असले, तरी जिल्ह्यात अजूनही अनेक ठिकाणी बिबट्यांचा मुक्त संचार सुरू असल्याने शेतकरी व नागरिक त्रस्त आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.