Satara News: ऐन पावसाळ्यात कऱ्हाडकरांवर पाण्याचे संकट आले होते. पाणीपुरवठा मुख्य पाइपलाइनच्या गळतीमुळे शहराला पावसाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागला. तीच पाइपलाइन पुलावरून घेत प्रशासनाने तात्पुरती उपाययोजना केली. .मात्र, आता ती पाइपलाइन महामार्ग खोदून पलीकडच्या जॅकवेलला जोडायची आहे. त्यासाठी ६०० मिलिमीटर व्यासाची पाइप नेण्याची परवानगी पालिकेला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून हवी आहे. अद्यापही त्याला परवानगी मिळाली नाही. सुमारे दोन कोटींच्या निधीचीही गरज आहे. या अपेक्षित खर्चामुळे त्यास विलंब होत आहे..Water Crisis: निधी जोड कशी साधणार?.त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने तो निर्णय घेऊन त्यास हिरवा कंदील दिल्यास पाणीटंचाईवर कायमचा उपाय निघणार आहे. सुविधा (पाणी, ड्रेनेज व विद्युत) देण्याची गरज आहे. त्यासाठी रस्ता क्रॉसिंग करण्याची आवश्यकता आहे. ती गरज भासल्यास आरसीसी डक्ट ठेवावे. कोयना नदी पत्रातील पिण्याच्या पाण्याची मुख्य पाइपलाइन यापूर्वी १५ जुलै २०२४ मध्ये नादुरुस्त झाली होती..भविष्यात असे संकट उद्भवू नये, यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सध्या सुरू असलेल्या नवीन पुलाच्या संरचनेवरून ६०० मिलिमीटर व्यासाची पाइपलाइन पुलाच्या दोन्ही बाजूने टाकण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे केली आहे. मात्र, ती मागणी प्रलंबित आहे. त्याला परवानगी मिळण्याची गरज आहे..Water Scheme Crisis: अकोट ८४ गावे पाणीपुरवठा योजनेवरील संकट लांबणीवर.पाइपलाइनचा कायमस्वरूपी पर्याय म्हणून नवीन कोयना पुलावरून ६०० मिलिमीटर व्यासाच्या दोन पाइपलाइन टाकाव्या लागणार आहेत. पाण्याचा दाब सहन करण्याची पुलाची क्षमता आहे का? त्याच्या तपासणीबाबत चर्चा झाली. त्यानुसार शासकीय अहवालही प्राप्त झाला आहे. महामार्गाच्या ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांशीही बोलणे झाले आहे..पहिली चाचणी यशस्वी झाल्यानंतर पाणीपुरवठा किती क्षमतेने होईल, हे स्पष्ट होईल. नदीपात्रातून वाहिन्या नेण्याऐवजी जुन्या कृष्णा पुलावरून ६०० मिलिमीटर व्यासाच्या ४५० मिलिमीटर व्यासाची लोखंडी पाइपलाइन टाकण्याचे काम करावे लागणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.