Radhakrishna Vikhe Patil Agrowon
Video

Radhakrishna Vikhe Patil : दुध दराच्या प्रश्नावर मंत्री विखे पाटील यांचे स्पष्टीकरण

Milk Producer: दुधाचे उपपदार्थांतून दूध संघांना मिळणाऱ्या उत्पन्नातील वाटा शेतकऱ्यांना द्यावा आणि त्यासाठी ७०-३० फॉर्म्यूला म्हणजेच एफआरपी अधिक रेव्हेन्यू शेअरिंग या पद्धतीनं दूधदर द्यावा, अशी मागणी दूध उत्पादक प्रतिनिधीमनी लावून धरली.

Team Agrowon

Milk Market: राज्य सरकारनं घातलेल्या अटीशर्थीमुळं दूध उत्पादकांना अनुदानपासून वंचित राहावं लागलं. त्यात खासगी दूध संघ ३० रुपये दर देण्यास टाळाटाळ करतात.  त्यामुळे शेतकऱ्यांना सरासरी २६ ते २७ रुपये दरच मिळतो. त्यातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वसूल होत नाही, असं शेतकरी सांगतात. अशी सगळी भानगड असल्यामुळं दूध उत्पादक मेटाकुटीला आलेत. पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री विखे यांनी गेल्यावर्षी ३० रुपये दर देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण खाजगी दूध संघांनी लीन सीझनमध्ये मंत्री विखे यांचे आदेश धाब्यावर बसवल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. त्यावेळी मंत्री विखे यांनी हात वर करत कर्तव्यापासून पळ काढला. आणि खाजगी दूध संघावर राज्य सरकार नियंत्रण ठेवू शकत नाही, असं सांगून टाकलं. त्यामुळं दूध उत्पादक प्रतिनिधि या बैठकीत रेव्हेन्यू शेअरिंग फार्म्यूल्यावर आडून होते. पण दूध संघांचा विरोधामुळं मंत्री विखे यांनी दूध उत्पादक प्रतिनिधींचा मुद्दा उडवून लावला. आणि ३० रुपये दराचं आश्वासन देऊन बैठकीचा सोपस्कार उरकून घेतला. त्यामुळं पुन्हा एकदा दूध दराचं घोंगडं भिजत पडलंय. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payments Pending: ऊस बिले द्या, अन्यथा जलसमाधि

Farmer Loan Waiver : २०१७ आणि २०१९ च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी निर्णय

Drinking Water Storage: तेरा प्रकल्पांतील साठा पिण्यासाठी आरक्षित

Tur Seeds Procurement: तेलंगणातील शेतकरी तूरीच्या बियाणे खरेदीसाठी करमाळ्यात

Agrowon Podcast: आल्याचा भाव टिकून; सोयाबीन टिकून, गहू आवक घटली, तर कापूस व कारले स्थिरावले

SCROLL FOR NEXT