orchard spacing guide agrowon
Video

Fruit Orchard Planning: फळबागेची आखणी आणि अंतर नेमकं कसं ठरवायचं?

आज आपण पाण्याची उपलब्धता, फळबागेची आखणी आणि अंतर याविषयी जाणून घेणार आहोत. याचीच माहिती सोलापूर येथील कोरडवाहू शेती संशोधन केंद्र मृद्‍ शास्त्रज्ञ डॉ. आदिनाथ ताकटे यांनी दिली आहे.

Team Agrowon

फळबागेची आखणी आणि अंतर

फळझाडांची आणि जागेची निवड झाल्यावर लागवडीसाठी आखणी करणे गरजेचे आहे. जमिनीची आखणी करण्यापूर्वी लागवडीची पद्धत ठरवावी. फळपिके लागवडीच्या चौरस, आयताकृती, त्रिकोणी, षटकोनी, उतार (कंटूर) अशा निरनिराळ्या पद्धती आहेत.

फळबागेसाठी खड्डा कसा भराल?

खड्डा खोदताना वरील व खालील थरातील माती वेगवेगळी टाकावी. खड्डे खोदल्यानंतर तीन आठवडे तापू द्यावेत, जेणेकरून सूर्यप्रकाशामुळे खड्ड्यांचे निर्जंतुकीकरण होईल. मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात खड्डे पुन्हा भरावेत. खड्डे मातीने भरताना ते निर्जंतुकीकरण करून तळाला वाळलेला पालापाचोळा १५ सेंमी थरात भरावा. मातीमध्ये २० ते २५ किलो चांगले कुजलेले शेणखत, २ ते ३ किलो गांडूळ खत, २ ते ३ किलो निंबोळी पेंड, २५ ग्रॅम टायकोडर्मा, १५ ग्रॅम स्फुरद विरघळविणारे जिवाणू, २५ ग्रॅम ॲझोटोबॅक्टर हे मिश्रण मिसळून घ्यावे. खड्डा जमिनीच्या वर ५ ते ७ सेंमी उंच भरून ठेवावा. म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीला लागवड करता येईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Procurement: दहा लाख टन कांदा खरेदीची केंद्राकडे मागणी, सकारात्मक निर्णयाची मुख्यमंत्री फडणवीसांना अपेक्षा

Farm Land Dispute: जमिनीच्या वादातून महिलेला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न

Livestock Farmers Support: चारशे पशुपालक शेतकऱ्यांना चाळीस लाखांची मदत

Scientific Dairy Farming: शास्त्रोक्त पशुपालनातून फायदेशीर दुग्ध व्यवसाय

Diesel Shortage: शेतीच्या कामांना इंधनटंचाईचा फटका

SCROLL FOR NEXT