Tractor Incident: शेतजमिनीच्या जुन्या वादातून महिलेला ट्रॅक्टर अंगावर घालून जखमी केल्याची धक्कादायक घटना पिंपळगाव बसवंत येथे घडली. या प्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलिस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे..पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अजय विष्णुगिरी गोसावी (वय ५१, रा.गोसावी वाडा, पिंपळगाव बसवंत) यांचा गट क्रमांक ४८७/१ व ४८७/२ या शेतजमिनीबाबत न्यायालयात वाद सुरू आहे. शुक्रवारी(ता.२३) दुपारी सव्वादोनच्या सुमारास संबंधित वादग्रस्त शेतात भाडेतत्त्वावर आणलेल्या ट्रॅक्टरद्वारे नांगरणी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर अजय गोसावी व त्यांच्या नातेवाइकांनी शेतात धाव घेतली. .Dhekale Land Dispute: ढेकाळेतील उपकेंद्राच्या जमिनीवरून नवा पेच .यावेळी ट्रॅक्टर चालक अजय चंद्रकांत उन्हाळे (रा.नारायण टेंभी,ता.निफाड) यास नांगरणी थांबवून पोलिस ठाण्यात येण्यास सांगण्यात आले. मात्र, त्याने ट्रॅक्टर न थांबवता पुढे चालवत अजय गोसावी यांच्या पत्नी रश्मी गोसावी यांच्या अंगावर ट्रॅक्टर घातल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे..Farmer Land Dispute: शेतकऱ्याच्या घरावर रिंगरोडसाठी बुलडोझर.या घटनेत रश्मी गोसावी यांच्या चेहऱ्यावरून ट्रॅक्टरचे मागील चाक गेल्याने त्यांच्या डोके,बरगड्या व पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने पिंपळगाव बसवंत येथील राधाकृष्ण हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रश्मी गोसावी यांना वाचवण्यासाठी गेलेल्या सुवर्णा सुभाष गोसावी यांनाही ट्रॅक्टरचा धक्का लागून हात व पायाला दुखापत झाली..तसेच अजय गोसावी यांनादेखील ट्रॅक्टरच्या नांगराच्या फाळाचा धक्का लागल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, ऋषिकेश निखील गोसावी याने ट्रॅक्टर चालकास ‘’ट्रॅक्टर थांबवू नको, चालू ठेव,’’ असा इशारा दिल्याचा आरोप असून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे..या प्रकरणी अजय चंद्रकांत उन्हाळे, ऋषिकेश निखील गोसावी, अभिषेक निनाद गोसावी, रेणू निनाद गोसावी, निनाद प्रताप गोसावी,सृष्टी निखिल गोसावी,स्मिता नितीन गोसावी व नितीन गोसावी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक बापू आहेर तपास करीत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.