Post Harvest Mechanization agrowon
Video

Paddy Cultivation: डीएसआर यंत्राने भात पेरणी कशी केली जाते?

पूर्व विदर्भातील दुर्गम, नक्षलप्रवण आणि धान म्हणजेच भात उत्पादक जिल्हा अशी ओळख असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात सुमारे एक लाख हेक्‍टरवर धान लागवड होते आणि त्यापैकी ३० ते ४० हेक्टरवरील धानाची रोवणी ही ‘ट्रान्स्प्लांटर’द्वारे होते. तर आज आपण धान पेरणी व रोवणीच्या यंत्राविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत...

Team Agrowon

या यंत्राचा वापर कसा केला जातो ते आपण जाणून घेऊ...

यासाठी १५ ते २० दिवसांची मॅट नर्सरी तयार केली जाते. तयार झालेली रोपे यंत्रावर ठेवून रोवणी होते. पण यांत्रिकीकरणाची ही पद्धत थोडी वेळकाढू असल्याने शेतकऱ्यांची पसंती मात्र पेरीव धान लागवड पद्धतीला असते. यासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्राला डीएसआर म्हणजेच डायरेक्ट सिडेड राइस असे म्हणतात. या ट्रॅक्टरचलित यंत्राद्वारे धानाची व खताचीही थेट पेरणी होत असल्याने आणि मॅट नर्सरीची गरज नसल्यामुळे रोपेनिर्मितीचा वेळ व त्यावरील खर्चातही बचत होते. डीएसआर यंत्राच्या वापरात दोन ओळींतील अंतर वीस सेंटिमीटर तर दोन बियाण्यांत अंतर १० सेंटिमीटर अपेक्षित आहे. दोन ओळींतील अंतर वाढवणेही शक्य असते. कारण या पद्धतीत उगवणाऱ्या तणाला नियंत्रित करण्यासाठी छोट्या यंत्राचा वापर करणे शक्य होते.डीएसआर पद्धतीत बारीक वाणाच्या एकरी दहा ते बारा किलो तर जाड वाणाच्या १२ ते १५ किलो बियाण्याचा वापर होत असल्याने बियाणे कमी लागतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: ‘त्या’ शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ; कृषिमंत्री भरणे यांची विधानसभेत माहिती

Monsoon Rain: पुणे जिल्ह्यातील दहा तालुक्यांत पावसाचा जोर

Defective Groundnut Seeds: निकृष्ट भुईमूग बियाणे बदलून मिळणार; कृषिमंत्र्यांच्या निर्देशाने शेतकऱ्यांना दिलासा

Dimbhe Dam Reservoir: डिंभे धरणक्षेत्रात ६७ मिमी पाऊस; पूर्व भागातील शेतकरी अजूनही जोरदार सरींच्या प्रतीक्षेत

Monsoon Alert: मॉन्सूनच्या पावसाला दमदार सुरुवात

SCROLL FOR NEXT