Tukadebandi cancellation agrowon
Video

Tukdebandi Kayda: तुकडेबंदी कायदा रद्दची अंमलबजावणी कधीपासून करण्यात येणार?

Bawankule land law announcement: एक गुंठेपर्यंतच्या जमिनीच्या व्यवहारांवर लागू असलेला तुकडेबंदी कायदा रद्द करण्यात येईल, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली.

Team Agrowon

tukkadebandi act Maharashtra: महाराष्ट्रातील धारण जमिनींचे तुकडे करण्यास प्रतिबंध करणाऱ्या १९४७ च्या कायद्यानुसार, ठराविक मर्यादेपेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या जमिनींची खरेदी-विक्री बंदी होती. या पार्श्वभूमीवर आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. १ जानेवारी २०२५ पर्यंत शहरी भाग, गावठाणापासून २०० मीटरपर्यंतच्या क्षेत्रात आणि विविध प्राधिकरणाच्या हद्दीतील जमिनींबाबत एक गुंठेपर्यंतचे झालेले तुकड्यांचे व्यवहार वैध ठरवले जाणार आहेत. त्यामुळे एक गुंठेपर्यंतच्या जमिनीच्या व्यवहारांवर लागू असलेला तुकडेबंदी कायदा रद्द करण्यात येईल, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. या निर्णयाबाबत सविस्तर माहिती देताना त्यांनी सांगितले की, या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पुढील १५ दिवसांत आदर्श कार्यपद्धती (एसओपी) तयार केली जाईल. या निर्णयामुळे सुमारे ५० लाख कुटुंबांना जमिनीच्या व्यवहारात दिलासा मिळणार आहे. मात्र, १ जानेवारी २०२५ नंतरच्या सर्व व्यवहारांवर विद्यमान नियम व कायद्यांनुसार कार्यवाही केली जाईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Family Compensation: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना तातडीने मदत; २५ कोटी मंजूर

Fake Fertilizer Sale: भोकरमध्ये बनावट खत विक्रीचा पर्दाफाश

Heavy Rainfall Impact: वादळाचा वीज महावितरणला झटका

Fertilizer Supply Issue: मंजूर साठ्यापेक्षा ४ हजार ४२८ टन कमी खताचा पुरवठा

Kharif Season Preparation: खरीप हंगामासाठी गावोगावी तयारीला वेग

SCROLL FOR NEXT