cyanide poisoning in animals agrowon
Video

Animal Poisoning: जनावरांतील वनस्पतीजन्य विषबाधेची कारणे अन उपाययोजना

पाळीव पशुंमध्ये (गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या इत्यादी) विविध कारणांनी विषबाधा होते. विषबाधा म्हणजे जनावरांच्या शरीरात एखादा विषारी घटक प्रवेश केल्यानंतर निर्माण होणारा आजार. जनावरांच्या शरीरक्रियेत बिघाड होऊन अचानक गंभीर लक्षणे दिसू शकतात. विषबाधेमुळे दूध व मांस उत्पादनातील घट, प्रजननातील अडचणी आणि अत्यंत प्रसंगी जनावरांचा मृत्यूदेखील होऊ शकतो.

Team Agrowon

चरण्यासाठी सोडलेल्या जनावरांनी काही वेळा आसपास उगवलेल्या विषारी तण-वनस्पतींचे सेवन केले तर विषबाधा होते. विशेषतः उन्हाळ्यात चाऱ्याची कमतरता असेल तेव्हा उपाशी जनावरे अनोळखी हिरव्या वनस्पती खातात आणि त्यामुळे विषारी घटक शरीरात जातात. काही पिकांच्या कोवळ्या अवस्थेतदेखील रासायनिक दृष्टीने विषारी द्रव्यांचे प्रमाण जास्त असते (उदा. ज्वारीचे कोवळे फुटवे). शेळ्या व मेंढ्यांसारखी जनावरे झुडपे व तण जास्त प्रमाणात खातात त्यामुळे वनस्पतीजन्य विषबाधा दिसते. मग विषबाधेची कारण आणि उपाययोजना काय आहेत? याचीच माहिती डॉ.सुषमा घाडीगावकर, डॉ. सोनाली जोंधळे  

सायनाइड विषबाधा:
ज्वारी, बाजरी यांसारख्या धान्याच्या कोवळ्या फुटव्यांमध्ये धुरीन नावाचा सायनोजेनिक ग्लायकोसाइड घटक असतो. हिरव्या अंकुरांचे अति सेवन केल्यास जनावरांच्या शरीरात हायड्रोसायनिक आम्ल मुक्त होऊन सायनाइडची विषबाधा होते.


लक्षणे:
- विषबाधेचे लक्षणे अगदी १० ते १५ मिनिटांत सुरू होऊ शकतात. जनावर अचानक व्याकुळ व अस्वस्थ होते, श्वासोच्छवास वेगाने होतो, लाळ गळू लागते.
- डोळे लालसर होत जातात. श्वासाला बदामासारखी दुर्गंधी येऊ शकते. स्नायूंना आकडी येतात, अंगावर ताठरपणा येतो. प्राणघातक मात्रेत सायनाइड गेल्यास ३० ते ४५ मिनिटात आकस्मिक मृत्यू होऊ शकतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Cheque Scam: खनिकर्म विभागाच्या नावे बनविले बनावट धनादेश

Pre Monsoon Livestock Vaccination: पशुधन संरक्षणासाठी राज्यात मॉन्सूनपूर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरुवात

Koyna Dam: कोयना धरणात ९.३० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा

Nomadic Livestock Herders: भटक्या पशुपालकांसाठी ‘सपोर्ट सिस्टीम’ची गरज

Monsoon Preparation: पुरापासून बचावासाठी जिल्हास्तरीय रंगीत तालीम; आपत्ती व्यवस्थापनाची तयारी

SCROLL FOR NEXT