Animal Tetanus agrowon
Video

Animal Disease: जनावरांमध्ये धनुर्वात होण्याची कारणे आणि प्रतिबंधात्मक उपाय

साध्या जखमेतूनही जनावरांना धनुर्वात या जिवघेण्या आजाराचा संसर्ग होऊ शकतो. धनुर्वात हा जनावरे आणि माणसाच्या मज्जातंतूंना जडणारा विषजन्य आणि जीवघेणा आजार आहे. या आजाराची लक्षणे, कारणे आणि उपाय याबद्दलची माहिती आपण या व्हिडीओतून घेणार आहोत.

Team Agrowon

धनुर्वाताचे जिवाणू हे माती आणि बहुतांश प्राण्यांच्या आतड्यांमध्ये असतात. माती, धूळ आणि गंजलेल्या टोकदार वस्तूंवर धनुर्वाताचे जिवाणू मोठ्या संख्येने असतात. जखमेचा संपर्क माती, धुळीसोबत आल्यास किंवा गंजलेल्या लोखंडाच्या वस्तूने जखम झाल्यास या जिवाणूचा संसर्ग होऊ शकतो. हे जिवाणू शरीरात वाढीदरम्यान विष तयार करतात. या विषाचा थेट परिणाम मज्जातंतूंवर होतो. त्यामुळे जनावराचा चेहरा आणि इतर स्नायू आखडले जातात. विशेष म्हणजे या आजाराची लागण बाधित प्राण्याच्या संपर्कातून, खाद्य, पाणी तसेच हवेतून होत नाही. तर कोणत्याही प्रकारची जखम तसेच अगदी साध्या ओरखड्यातूनही हे जिवाणू शरीरात शिरतात.  गाय, कुत्रा, मांजर आणि वराहामध्ये या आजाराला प्रतिकार करण्याची शक्ती जास्त असते. पण शेळ्या, मेंढ्या, घोडा आणि माणसांमध्ये धनुर्वाताच्या जिवाणूचा संसर्ग जास्त प्रमाणात आढळतो. नवजात पिलांमध्ये नाळ कापताना झालेल्या संसर्गातून तत्काळ संक्रमण होऊन धनुर्वात उद्‌भवू शकतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: कृषी शिक्षण, संशोधनावरील तरतूद वर्षागणिक तोकडीच

Bharat-VISTAAR AI: अर्थसंकल्पातून 'भारत विस्तार एआय'ची घोषणा, याचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Sandlwood Cultivation : चंदन लागवडीसाठी अर्थसंकल्पात तरतूद; पाच राज्यांमध्ये चंदनाची सर्वाधिक लागवड

Groundwater Management: सर्व विभागाच्या समन्वयातून भूजल व्यवस्थापनाची गरज

Union Budget 2026: कृषी, ग्रामीण उद्योगासह शेतकरी हिताचा संकल्प

SCROLL FOR NEXT