आहारात असावी आरोग्यदायी बाजरी 
तृणधान्ये

आहारात असावी आरोग्यदायी बाजरी

सचिन शेळके, कृष्णा काळे

गहू खाण्याचे प्रमाण वाढत गेल्याने ज्वारी, बाजरी, नाचणी यांसारख्या पिकांचा आहारातील वापर कमी होत चालला आहे. ही पिके आरोग्यासाठी महत्त्वाची असून, त्यातील बाजरी या धान्याचे फायदे पाहू. मराठी नाव : बाजरी शास्त्रीय नाव : पेन्निसेटम ग्लॅकम इंग्रजी नाव : पर्ल मिलेट कुळ : पोएसी एकेकाळी कोरडवाहू पिकांमध्ये बाजरी हे महत्त्वाचे पीक होते. आता बाजरी ही महाराष्ट्राच्या जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्याच्या पट्ट्यामध्ये पेरली जाते. सुमारे १०-१५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाल्याचा अंदाज आहे. बाजरीचा व्यवस्थापन खर्च हा गहू पिकापेक्षा कमी आहे. आपल्याकडे बाजरीचा वापर प्रामुख्याने भाकरीच्या स्वरूपामध्ये केला जात असला तरी त्यापासून लाडू, उपमा, पकोडे, थालीपीठ, खिचडी, डोसा असे अनेक रुचकर पदार्थ बनवणे शक्य आहे. बाजरीतील घटक : बाजरीच्या दाण्यात ओलावा (आर्द्रता) पंधरा ते अठरा टक्के, प्रथिने २२ टक्के, कर्बोदके २५ टक्के, फायबर १७ टक्के, उष्मांक ७५६ किलो कॅलरीज, जीवनसत्त्व बी ६ - ७६८ मायक्रो मि.ली., जीवनसत्त्व ई १०० मायक्रो मि.लि., कॅल्शियम १६ मि.लि., लोह ६ मि.लि., मॅग्नेशियम २२८ मि.लि. ग्रॅम. बाजरीची उपयुक्तता :

  • बाजरी ही उत्तम ऊर्जा स्रोत (३६१ किलो कॅलरी) असून, त्यात गहू व तांदूळ यापेक्षा अधिक ऊर्जा असते. प्रथिने, जीवनसत्त्वे, कॅल्शियम, जीवनसत्त्व बी ६ अधिक प्रमाणात आहेत.
  • बाजरीमध्ये काही घटकांमुळे शरीरातील स्निग्ध पदार्थाचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. परिणामी हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
  • बाजरीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम यांचे प्रमाण जास्त असून, त्यामुळे रक्तपुरवठा नियमित होण्यास मदत होते.
  • बाजरीमध्ये फायबर (तंतुमय पदार्थ) अधिक असून, ते पचनक्रियेसाठी मदत करतात.
  • बाजरीच्या नियमित सेवनामुळे शरीरातील हाडे मजबूत होतात.
  • मधुमेही व्यक्तींसाठी बाजरीची भाकरी लाभदायी ठरते.
  • ज्या व्यक्तींना आम्लपित्तांचा त्रास आहे, त्यांच्यासाठीही बाजरी उपयुक्त ठरते.
  • सचिन शेळके, ८८८८९९२५२२ कृष्णा काळे, ८९९९१२८०९९ (लोकनेतेे गोपीनाथरावजी मुंडे अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, लोदगा, लातूर.)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Tiger Corridor Maharashtra : ‘टायगर कॉरिडॉर’च्या निर्णयाविरोधात याचिका दाखल

    Weather Station : हवामान केंद्राची उंची दहा मीटर करा ः स्वाभिमानी शेतकरी संघटना

    Crop Loan : पीककर्ज वाटपावर कर्जमाफीचे सावट

    Jat Water Storage : जतमध्ये पाणीसाठ्यात १६ टक्क्यांनी वाढ

    AI In Sugarcane : ऊस शेतीत ‘एआय’ वापरासाठी ‘केडीसीसी’कडे अर्ज करा

    SCROLL FOR NEXT