मुंबई, पुणेसह राज्यातील २९ महापालिका निवडणुका जाहीरमतदान १५ जानेवारी २०२६ रोजी होणारमतमोजणी १६ जानेवारी २०२६ रोजी होईलआजपासून आचारसंहिता लागू नामनिर्देशन पत्र ऑफलाईन स्वीकारण्यात येईलराज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची माहिती.Maharashtra Municipal Corporation Elections: मुंबई (BMC elections), पुणेसह राज्यातील २९ महापालिका निवडणुकीची घोषणा आज सोमवारी (दि. १५ डिसेंबर) राज्य निवडणूक आयोगाने केली. या निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी १६ जानेवारी २०२६ रोजी होईल. यासाठी आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली..उमेदवारांचा नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्याचा कालावधी २३ ते ३० डिसेंबर असेल. अर्जांची छाननी ३१ डिसेंबर २०२५ रोजी होईल. तर उमेदवारी अर्ज माघारीची मुदत २ जानेवारी २०२६ असेल. निवडणूक चिन्ह आणि अंतिम उमेदवारांची यादी ३ जानेवारी प्रसिद्ध करण्यात येईल, असे त्यांनी त्यांनी सांगितले..Election Transparency: निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह.मुंबईतील प्रत्येक प्रभागातील मतदारांना एकच मत द्यावे लागेल. तर २८ महानगरपालिकांमध्ये बहुसदस्य असल्याने एका प्रभागात मतदारांना ३ ते ५ मते द्यावी लागतील. नामनिर्देशन पत्र ऑफलाईन स्वीकारण्यात येईल. उमेदवारांना सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागेल, असे वाघमारे यांनी सांगितले. .Local Body Election: महापालिकेत मतदानासाठी ग्रामीण भागातील नावांची नोंदणी.मतदार यादी १ जुलै २०२५ रोजी अधिसूचित केलेली मतदारयादी वापरण्यात येईल. ३ कोटी ४८ लाख ७८ हजार १७ मतदार आहेत. मतदानाच्या ४८ तास आधी प्रचार संपेल, अशीही माहिती त्यांनी दिली..२९ महानगरपालिकांमध्ये एकूण जागा २,८५९ जागा आहेत. त्यात महिलांसाठी १,४४२ जागा आरक्षित आहेत. .'या' महापालिकांची निवडणूकअहिल्यानगर, अकोला, अमरावती, भिवंडी निजामपूर, बृहन्मुंबई, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, धुळे, इचलकरंजी, कोल्हापूर, जळगाव, जालना, कल्याण डोंबिवली, लातूर, मालेगाव, मीरा भाईंदर, नागपूर, नांदेड वाघाळा, नाशिक, नवी मुंबई, पनवेल, परभणी, पिंपरी चिंचवड, पुणे, सांगली- मिरज- कुपवाड, सोलापूर, ठाणे, उल्हासनगर, वसई- विरार.यातील जालना, इचलकरंजी ह्या नवनिर्मिती महापालिका आहेत. .गेल्या काही वर्षांपासून महानगरपालिका निवडणुका प्रलंबित होत्या. या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यापूर्वी या निवडणुका घेण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. .जिल्हा परिषद निवडणुकांचीही तयारीज्या जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्याद ५० टक्क्यांच्या आत आहे; अशा १२ जिल्हा परिषदा आहेत. येथे आम्ही निवडणुकीसाठी नियोजन करत असल्याचे वाघमारे यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.