Pune News: राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ‘आम आदमी विमा योजना’ राबवली जाते. ही योजना केंद्र सरकारच्या सहकार्याने राबवली जाते. या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील १८ ते ५९ वयोगटातील भूमिहीन मजुरांना विमा संरक्षण आणि त्यांच्या मुलांना शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो..या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना दरवर्षी फक्त २०० रुपये प्रीमियम भरावा लागतो. या रकमेपैकी १०० रुपये केंद्र सरकार आणि १०० रुपये राज्य सरकार सबसिडी स्वरूपात देते. त्यामुळे मजुरांना अतिशय कमी खर्चात विमा संरक्षण आणि आर्थिक सुरक्षितता मिळते..या योजनेद्वारे अनपेक्षित घटना घडल्यास मजुरांच्या कुटुंबांना विमा संरक्षण मिळते. यात नैसर्गिक मृत्यू, अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व, डोळे अथवा अवयव गमावणे यांसारख्या परिस्थितीत विमा लाभ दिला जातो..तसेच विमाधारकाच्या ९वी ते १२वीत शिकणाऱ्या कमाल दोन मुलांना शिष्यवृत्ती दिली जाते. ज्यामुळे कुटुंबाची आर्थिक व सामाजिक सुरक्षितता अधिक मजबूत होते. ही शिष्यवृत्ती दरवर्षी दोन हप्त्यांत (१ जुलै व १ जानेवारी रोजी) वितरित केली जाते. त्यामुळे गरीब व भूमिहीन मजुरांच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळतो आणि मुलांचे शिक्षण सुरू राहण्यास मदत होते...Mahila Samruddhi Yojana: सरकारकडून महिलांसाठी मिळतंय ५० हजारांपर्यंत कर्ज; जाणून घ्या काय आहे योजना?.योजनेचा उद्देशग्रामीण भागातील गरीब भूमिहीन मजुरांना ज्यांचे वय १८ ते ५९ वर्षे असणाऱ्यांना अपघात, मृत्यू किंवा अपंगत्वाच्या प्रसंगी विमा संरक्षण देणे. तसेच त्यांच्या मुलांना शाळेची शिष्यवृत्ती देणे हा मुख्य उद्देश आहे..योजनेचे फायदेविमा कालावधी संपण्यापूर्वी नैसर्गिक मृत्यू झाल्यास नामनिर्देशित व्यक्तीस ३० हजार रुपये मिळतात.अपघातामुळे मृत्यू झाल्यास नामनिर्देशित व्यक्तीस ७५ हजार रुपये मिळतात.अपघातामुळे कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व आल्यास ७५ हजार रुपये मिळतात.अपघातात दोन्ही डोळे किंवा दोन अवयव गमावल्यास ७५ हजार रुपये मिळतात.अपघातात एक डोळा किंवा एक अवयव गमावल्यास ३७ हजार ५०० रुपये मिळतात.तसेच, विमाधारकाच्या प्रति कुटुंब कमाल दोन मुलांना, इयत्ता ९वी ते १२वी मध्ये शिक्षण घेत असल्यास दरमहा १०० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते..Aai Scheme: महिलांना १५ लाखांपर्यंत उद्योगासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज.योजनेच्या अटी व पात्रताअर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.अर्जदार ग्रामीण भागात वास्तव्यास असावा.त्याचे वय १८ ते ५९ वर्षांदरम्यान असावे.अर्जदार भूमिहीन मजूर असावा.अर्जदाराच्या कुटुंबाकडे शेतीची कोणतीही जमीन नसावी.अर्जदाराने इतर कोणत्याही विमा योजनेचा लाभ घेतलेला नसावा..आवश्यक कागदपत्रेओळखपत्रवयाचा पुरावापत्त्याचा पुरावाभूमिहीनतेचा दाखलापासपोर्ट आकाराच्या फोटोउत्पन्नाचा दाखलाअर्ज फॉर्मस्व-प्रमाणनइतर कागदपत्रे (आवश्यक असल्यास).अर्ज प्रक्रियाजिल्हाधिकारी / तहसीलदार / तलाठी कार्यालयातून अर्ज फॉर्मची प्रत घ्यावी.अर्ज फॉर्म पूर्ण व अचूक भरावा, त्यावर पासपोर्ट आकाराचा फोटो चिकटवावा आणि सर्व आवश्यक कागदपत्रांच्या स्व-प्रमाणित प्रती जोडाव्यात.भरलेला अर्ज व कागदपत्रे संबंधित अधिकाऱ्याकडे सादर करावीत.अर्ज सादर केल्यानंतर प्राप्तीपत्र घ्यावे; त्यावर तारीख, वेळ व अर्ज क्रमांक नमूद असणे आवश्यक आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.