Summer Soybean 
तेलबिया पिके

महाराष्ट्रात उन्हाळी सोयाबीनच्या पेऱ्यात लक्षणीय वाढ

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रातील उन्हाळी सोयाबीन पेरणी क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. यंदाच्या हंगामात उन्हाळी तेलबियांची ४० हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी हाच आकडा १० हजार हेक्टर इतका होता.

टीम ॲग्रोवन

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रातील उन्हाळी सोयाबीन (Summer Soybean) पेरणी क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. यंदाच्या हंगामात उन्हाळी सोयाबीनची ४० हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी हाच आकडा १० हजार हेक्टर इतका होता. उन्हाळी पिकांमध्ये सोयाबीनला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दीिसत आहे. इंडियन एक्सप्रेसने याबाबचे वृत्त दिले आहे.  

गेल्या खरीप हंगामात सोयाबीनला मिळालेल्या दरांमुळे उन्हाळी सोयाबीनच्या पेरणीकडे (Summer Soybean Sowing) शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे. राज्यात ४५ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात सोयाबीन लागवड करण्यात आलेली आहे. यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांनी आपल्याकडील सोयाबीन टप्प्याटप्प्याने विकले. ज्यामुळे बहुतांश बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सरासरी ६३०० ते ६४०० प्रति क्विंटलाचा दर मिळत आहे.

शेतकऱ्यांना स्वत:चे बियाणे तयार करता यावे, यासाठी कृषी विभागाने गेल्या वर्षापासून सोयाबीनचा प्रकल्प हाती घेतला आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी रब्बी हरभरा काढणीनंतर बहुतांशी फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत उन्हाळी पिकाची पेरणी करतात. राज्यातील सर्व भागात उन्हाळी सोयाबीनची पेरणी झाल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून दिसते. राज्यात लातूर आणि औरंगाबादमध्ये अनुक्रमे १४ हजार आणि १३ हजार ८७९ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची सर्वाधिक पेरणी झाली आहे. याशिवाय उस पट्ट्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूर आणि पुण्यामध्ये अनुक्रमे तीन हजार १५५ आणि दोन हजार ८१६ हेक्टरवर शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीन पेरले आहे.      

गेल्या तीन वर्षांपासून सरकारने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किमतीपेक्षा सोयाबीनला चांगला दर मिळत आहे. गेल्यावर्षी सोयाबीनच्या दराने  प्रति क्विंटलला १० हजार रुपयांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला होता. दरम्यान, केंद्र सरकारने हस्तक्षेप करत सोयापेंडीच्या आयातीला परवानगी दिली. देशात पहिल्यांदाच तेलबिया आणि सोयापेंड या दोन्हीवर स्टॉक लिमिट लागू केली तरीही सोयाबीनचे दर खाली आले नाहीत. दरम्यान, शेतकरी उन्हाळी सोयाबीनचे पीक प्रामुख्याने पुढील खरीप हंगामासाठी बियाणे तयार करण्यासाठी घेतात.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Temperature Rise: खानदेशात उष्णता वाढू लागली; शेतीकामांच्या वेळेत होतोय बदल

Weather Update: राज्यात ऊन, उकाडा वाढला; बहुतांशी भागांत किमान आणि कमाल तापमानात वाढ

Girna Dam: गिरणा धरणातून दुसरे आवर्तन

IAS Varsha Meena: प्रत्येक कुटुंबाला शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न करा : जिल्हाधिकारी वर्षा मीना

Medicinal Plants: औषधी वनस्पतींमुळे उत्पन्न वाढणार

SCROLL FOR NEXT