Oil seed sowing 
तेलबिया पिके

चालू रब्बी हंगामात तेलबियांच्या पेरणी क्षेत्रात विक्रमी वाढ

चालू रब्बी हंगामाच्या अखेरी एकूण पेरणी क्षेत्राने ७०० लाख हेक्टरचा विक्रमी टप्पा गाठला आहे. यंदा गव्हाच्या पेरणी क्षेत्रात किंचित घट झाली आहे. गव्हाची पेरणी ३४३ लाख हेक्टरवर असली तरी तेलबियांच्या पेरणीत चांगली कामगिरी दिसत आहे. चालू हंगामात प्रामुख्याने मोहरीचे रब्बी पिकांच्या एकूण पेरणीत विक्रमी टप्पा गाठला आहे.

टीम ॲग्रोवन

चालू रब्बी हंगामाच्या (Current Rabi Season) अखेरी एकूण पेरणी (Overall Sowing) क्षेत्राने ७०० लाख हेक्टरचा विक्रमी टप्पा गाठला आहे. यंदा गव्हाच्या पेरणी क्षेत्रात किंचित घट झाली आहे. गव्हाची पेरणी (Wheat Sowing) ३४३ लाख हेक्टरवर असली तरी तेलबियांच्या पेरणीत (Oil Seed Sowing) चांगली कामगिरी दिसत आहे. चालू हंगामात प्रामुख्याने मोहरीचे (Mustard Sowing) रब्बी पिकांच्या एकूण पेरणीत विक्रमी टप्पा गाठला आहे.  

चालू हंगामात ४ फेब्रुवारीपर्यंत रब्बीतील पिकांची ७०० लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. मागील हंगामात याच कालावधित झालेल्या ६९० लाख हेक्टरच्या तुलनेत यंदा पेरणी क्षेत्रात १ टक्क्यांची वाढ दिसत आहे. तर दुसरीकडे तेलबियांच्या पेरणी (Sowing Of Oil Seed) क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत २३ टक्क्यांनी वाढून १०२ लाख हेक्टरवर झाली आहे. पुढील हंगामामध्ये तेलबियांच्या पेरणी क्षेत्रात आणखी वाढ अपेक्षित आहे. कारण केंद्र सरकारने २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात (Budget 2022) तेलबियांवर अधिक लक्ष केंद्रीत करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

तेलबियांच्या आयातीवरील अवलंब कमी करण्यासाठी देशांतर्गत तेलबिया उत्पादन (Oil seed Production) वाढविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यासाठी सर्वसमावेशक योजना राबविण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सितारामण (Nirmala Sitaraman) यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात बोलताना सांगितले आहे. कोरोना लाटेचे संकट असतानाही रब्बीच्या पेरणी क्षेत्रात झालेली वाढीमुळे यावर्षी (२०२१-२२) मध्ये देशात अन्नधान्य आणि तेलबियांचे विक्रमी उत्पादनाच्या मार्गावर आहे.

कोरोनाच्या पहिल्या वर्षात (२०२०-२१) देशात ३०८ दशलक्ष टन अन्नधान्याचे उत्पादन झाले होते. जे आतापर्यंतचे विक्रमी उत्पादन आहे. कडधान्ये आणि तेलबियांचे उत्पादन देखील अनुक्रमे २५७.१९ लाख आणि ३६१.०१ लाख टन इतके उच्चांकी होते.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होण्यास सुरुवात, जयकुमार गोरेंची माहिती

Nagpur Agriculture : नागपुरात कृषी विभागाचा कारभार रामभरोसे; पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक!

Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!

November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?

Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

SCROLL FOR NEXT