सूर्यफूल लागवड नियोजन 
तेलबिया पिके

सूर्यफूल लागवड नियोजन

सूर्यफूल लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी. आम्लयुक्त आणि बांध जमिनीत हे पीक चांगले येत नाही.

कृषी विद्या विभाग, राहुरी
  • जमीन : सूर्यफूल लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी. आम्लयुक्त आणि बांध जमिनीत हे पीक चांगले येत नाही.
  • पूर्वमशागत : जमिनीची खोल नांगरट करून त्यानंतर कुळवाच्या उभ्या आडव्या दोन ते तीन पाळ्या द्याव्यात. शेवटच्या कुळवाच्या पाळीपूर्वी हेक्टरी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत घालावे.
  • वाणांची निवड : सुधारित जाती: फुले भास्कर, एस एस-५६, मॉर्डेन, ई सी-६८४१४, भानू
  • संकरित वाण : के बी एस एच-१, एल एस एफ एच-१७१, एल एस एफ एच-३५, एल एस एफ एच -४४, फुले रविराज, एम एस एफ एच-१७
  • पेरणीची वेळ : जुलै पहिला पंधरवडा.
  • बीजप्रक्रिया : केवडा रोग टाळण्यासाठी अॅप्रॉन (३५ एस.डी.) ६ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे. तसेच विषाणूजन्य (नेक्रॉसिस) रोगाच्या प्रतिबंधासाठी इमिडॅक्लोप्रिड (बीजप्रक्रियेसाठीचे फॉर्म्युलेशन) ५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास लावावे. त्यानंतर अॅझोटोबॅक्टर हे जिवाणू खत २५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास पेरणीपूर्वी लावावे.
  • खतमात्रा : कोरडवाहू पिकास प्रति हेक्टरी २.५ टन शेणखत तसेच ५० किलो नत्र, २५ किलो स्फुरद आणि २५ किलो पालाश पेरणीच्या वेळेस दोन चाड्याच्या पाभरीने पेरून द्यावे. बागायती पिकास प्रति हेक्टरी ६० किलो नत्र + ६० किलो स्फुरद + ६० किलो पालाश द्यावे. यापैकी ३० किलो नत्र व संपूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीच्या वेळी द्यावे व उरलेल्या ३० किलो नत्राची मात्रा पेरणीनंतर एक महिन्याच्या आत द्यावी. गंधकाची कमतरता असलेल्या जमिनीसाठी प्रति हेक्टरी २० किलो गंधक पेरणीच्या वेळी गांडूळ खातात मिसळून द्यावे.
  • संपर्क ः ०२४२६ -२४३२३९ (कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Monsoon 2026: माॅन्सूनची आगेकूच सुरुच; माॅन्सूनने संपूर्ण अंदमान आणि निकोबर बेटे व्यापून वाटचाली कायम ठेवली

    Farm Loan Repayment: यंदाच्या वर्षातील वसूलपात्र रक्कम मुदतीत भरा : मंत्री हसन मुश्रीफ

    Onion Rate Issue: कांदा साठवावा तर सडतोय, विकावा तर मातीमोल भाव

    Interview with Raju Shetti: ‘कोकणच्या पुढाऱ्यांनी प्रश्‍नांचं गांभीर्य समजून घ्यावं’

    Khandesh Irrigation Projects: खानदेशातील अनेक सिंचन प्रकल्प अपूर्ण

    SCROLL FOR NEXT