शेतकरी नियोजन उन्हाळी सोयाबीन 
तेलबिया पिके

शेतकरी नियोजन उन्हाळी सोयाबीन

शेतकरी ः सागर मोरे गाव ः कोऱ्हाळे बु., थोपटे वाडी, ता. बारामती, जि. पुणे सोयाबीन क्षेत्र ः ६ एकर

गणेश कोरे

मी गेल्या तीन वर्षांपासून सोयाबीनचे खरिपामध्ये आंतरपीक आणि उन्हाळी हंगामात नियमित उत्पादन घेत आहे. या हंगामात या वर्षी २७ जानेवारी, २ आणि १० फेब्रुवारी अशा तीन टप्प्यांमध्ये ६ एकरांवर सोयाबीनची टोकण पद्धतीने लागवड केली आहे. लागवड करताना नांगरणी, फणणी, सरी काढून खतांचा बेसल दिला. त्यानंतर ४ फूट रुंदीचे बेड तयार केले. यावर चार फुटांच्या अंतरावर ठिबक सिंचनाच्या तीन लाइन अंथरल्या. मात्र खरिपात दोन, तर उन्हाळी हंगामात तापमान जास्त असल्याने तीन रांगांमध्ये ठिबक अंथरण्यात आले. उन्हाळी हंगामासाठी जानेवारीमध्ये सोयाबीनची लागवड केली जाते. लागवडीपूर्वी बियाण्यांवर बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची प्रक्रिया केली.   लागवडीनंतर १५ व्या दिवशी भुरी व खोड पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने कीडनाशक, बुरशीनाशकांची फवारणी घेतली. यानंतरही तणांचे वाढलेले प्रमाण लक्षात घेता तणनाशकांची फवारणी केली. २१ व्या दिवशी झाडे पानावर आल्यावर १९-१९ एकरी अडीच किलो आणि ह्युमिकच्या १ लिटर खताची मात्रा ठिबकद्वारे देण्यात आली. सध्या कीड-रोगांचा प्रादुर्भावासाठी सर्वेक्षण करून योग्य ते व्यवस्थापन करण्यावर भर दिला जात आहे. सध्या उन्हाचे प्रमाण वाढू लागल्याचे संकेत मिळत आहेत. दिवसभर चांगली उन्हे पडत असल्याने खरिपाच्या तुलनेत कीड-रोगांचा प्रादुर्भाव या हंगामात कमी राहतो. त्यामुळे फवारण्यादेखील कमी लागतात. 

टप्प्याटप्प्याने लागवड ः   माझ्याकडे सोयाबीन सहा एकर क्षेत्रावर आहे. मी मुद्दाम १५-१५ दिवसांच्या अंतराने तीन टप्प्‍यांमध्ये लागवड केली आहे. यामुळे कामे विभागली जातात. अगदी काढणी हंगामात एकाच वेळी पीक काढणीला येत नाही. परिणामी, पीक व्यवस्थापन सोपे होत आहे, असा अनुभव मोरे सांगतात.

खरिपापेक्षा उन्हाळी हंगामात बियाणे जास्त  खरिपामध्ये एकरी सव्वातीन किलो बियाणे लागते. मात्र उन्हाळी काढणीच्या हंगामातील लागवड ही जानेवारीमध्ये होते. जानेवारी महिन्यात जास्त थंडी व धुके आणि सोबत वाहणाऱ्या वाऱ्यामुळे बियाणे उगवणीचे प्रमाण कमी राहते. हे लक्षात घेता दोन- दोन बिया सव्वा फुटाच्या अंतरावर टोकण्यात आल्या. या पद्धतीमध्ये खरीप हंगामात एक बी टोकण केल्याने एकरी केवळ सव्वा तीन किलो बियाणे लागते, तर ते उन्हाळी हंगामात ते एकरी ८ किलो एवढे लागते, असे मोरे यांनी सांगितले. सागर मोरे,  ९७००९४९५००  (शब्दांकन ः गणेश कोरे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Germination Complaints: सोयाबीन उगवण तक्रारी आठ हजारांवर

Youth Protest: तरुणांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा; सरकार चर्चेसाठी तयार, ‘सीजेपी’च्या अटी कायम

Rahul Gandhi: विद्यार्थ्यांवरील हल्ल्याची चौकशी करा : राहुल गांधी

Farm Loan Waiver List: मुहूर्ताची यादी ५३३ शेतकऱ्यांची !

Monsoon Rain Forecast: पुण्याच्या घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’ कायम

SCROLL FOR NEXT