पिक उत्पादनामध्ये पेरणीपूर्व मशागत हा एक महत्वाचा भाग आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे सध्या बरेच शेतकरी शेताच्या मशागतीच्या कामात गुंतले आहेत.
जल संवर्धनाच्या (Water Conservation) दृष्टीने जमिनीची खोल नांगरट केली जाते. मात्र आपल्याकडे वर्षानुवर्ष जमिनीची मशागत एका विशिष्ट पद्धतीने केली जाते. त्यामुळे जमिनीचा ६ इंच खालील थर हा घट्ट बनतो.
शेतामध्ये अवजड यंत्राचा,ट्रक्टरचा सतत अतिवापर केल्यासही जमिन कठीण बनते. या कठीण घट्ट थरामुळे जमिनीत हवेचे प्रमाण कमी होऊन जमिनीवर पाणी साठून राहत. पाणी मुरण्याच्या क्रियेत अडथळा निर्माण झाल्यामुळे जमिनीवरून वाहणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढून धुपिचे प्रमाण वाढत.
तसेच पाण्याचा निचरा न झाल्यामुळे जमिनी चीभड होण्याच प्रमाणही दिवसेंदिवस वाढतंय. एकंदरीतच पिक वाढी करता पोषक जमीन नसल्यामुळे या सर्वाचा परिणाम हा पीक उत्पादनावर होतो. त्यामुळे जमीन कडक बनण्यापासून रोखायची असल्यास दर ३ वर्षातून एकदा सबसॉलरचा वापर करावा.
या यंत्राच्या वापरामुळे खर्चात थोडी वाढ होत असली तरी कोरडवाहू जमिनीत सबसॉयलरचा वापर फायदेशीर आहे. तर या सबसॉयलर चा वापर कसा करायचा? आणि सबसॉयलरचे फायदे काय आहेत? याविषयी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे डॉ. स्मीता सोलंकी आणि प्रमोद रेणापूरकर यांनी दिलेली माहिती पाहुया.
सबसॉयलर चा वापर कसा करायचा?
सबसॉयलर नांगराच्या कार्यक्षम खोलीच्या खाली जमिनीत तयार झालेला कठीण थर फोडून काढतं. त्यामुळे जमिनीत हवा खेळती राहते, पाणी मुरवण्यासाठी व जास्तीच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मदत होते.
जमिनी खालील कठीण थर फोडण्यासाठी या यंत्राचा वापर हा ज्या दिशेने शेताची मशागत करावयाची आहे त्या दिशेशी काटकोनात करावा. जमीन कठीण व कोरडी असल्यास सबसॉयलरमुळे जमिनी खाली तडे जावून कठीण थर मोकळा होतो. या यंत्राद्वारे दीड ते अडीच फुट खोल जमीन मोकळी होते.
४५ एच.पी. च्या पुढील क्षमतेच्या ट्रक्टरला सबसॉयलर जोडल्यास ते व्यवस्थित कार्य करत. या मध्ये एका मांडीचा सबसॉयलर व दोन अथवा अधिक मांडीचा सबसॉयलर सध्या बाजारपेठेत उपलब्ध आहेत.
हे यंत्र ओलसर जमिनीत वापरल्यास जमिनीत फक्त भेग पडल्याचे दिसते त्यामुळे या यंत्राची फारशी परिणामकारकता मिळत नाही. त्यामुळे सबसॉलरचा वापर कोरडवाहू जमिनीत अधिक फायदेशिर ठरतो.
सबसॉयलरचे फायदे काय आहेत?
सबसॉयलरने मशागत केल्यास पेरणीसाठी योग्य जमीन तयार होते. या मशागत पद्धतीमुळे पडणाऱ्या पावसाचं पाणी जमिनीत खोलपर्यंत जाण्यास मदत होते.
पिकाची मुळे खोलवर जावून आवश्यक ती अन्नद्रव्ये घेवून चांगली वाढतात व पीक उत्पादनात वाढ मिळते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.