Pesticide Nozzle  Agrowon
टेक्नोवन

Pesticide Nozzle : फवारणीसाठी योग्य गुणवत्तेच्या नोझलची निवड

डॉ. सचिन नलावडे

Indian Agriculture : फळबागा आणि भाजीपाला पिकांमध्ये कीड-रोग व्यवस्थापनासाठी रासायनिक फवारण्या अधिक घेतल्या जातात. प्रभावी नियंत्रणासाठी फवारणी योग्य पद्धतीने होणे अत्यंत आवश्‍यक असते. कोणत्याही फवारणी पंपाचा महत्त्वाचा भाग म्हणजे नोझल. योग्य नोझल वापरल्यास कीडनाशकाची बचत होते. फवारणी योग्यप्रकारे होऊन पीक संरक्षण उत्तम होण्यास मदत मिळते. खराब किंवा गळती होणारा नोझल असल्यास योग्य परिणाम मिळत नाहीत. त्यासाठी असा नोझल तातडीने बदलावा.

समजा, गळती होणाऱ्या नोझलमधून प्रति मिनिट १ मिलि कीडनाशकाचे द्रावण गळत असेल, तर दिवसभरात सुमारे ४.८० लिटर द्रावण वाया जाते. याची सध्याच्या महागड्या कीडनाशकांच्या किमतीशी सांगड घातल्यास जास्त आर्थिक नुकसान होत असल्याचे दिसून येईल. म्हणूनच फवारणीसाठी योग्य नोझलची निवड, देखभाल आणि गरजेनुसार नोझल त्वरेने बदलणे याकडे लक्ष दिले पाहिजे.

ॲडजस्टेबल नोझल

अधिक उंच किंवा माणसाच्या आवाक्याबाहेर असलेल्या लक्ष्यावर (उंच व अधिक कॅनॉपी असलेली झाडे) फवारणी करण्यासाठी.

वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे पोकळ शंकूपासून, सरळ मोठ्या धारेपर्यंत सर्व प्रकारचे शंकू पॅटर्न तयार करता येतात.

प्रवाह आणि थेंबांचा आकार नोझलच्या कोनाबरोबर इतका बदलतो, की ठरावीक एकच प्रवाह मिळविणे हे कौशल्याचे काम असते.

डबल स्विर्ल स्प्रे नोझल

एकाच वेळी वेगवेगळ्या दिशांना फवारणी करता येते.

यात कोणत्याही प्रकारची नोझलची टोके जोडता येतात. उदा. हॉलो कोन, सॉलिड कोन किंवा फ्लॅट कोन.

जास्त प्रमाणात फवारणी करण्यासाठी उपयुक्त.

एअर इंडक्शन नोझल

हे नोझल म्हणजे हवेबरोबर वाहून जाणाऱ्या रसायनाची बचत करणारा नवा शोध आहे. यामध्ये फवाऱ्याने हवा सोडली जाते. त्यामुळे बुडबुड्याप्रमाणे तुषार तयार होऊन वेगाने झाडाच्या आतपर्यंत घुसतात. पानांवरून घरंगळून पडत नाहीत.

(नोझल कोड व छायाचित्रे स्रोत : अस्पी) - डॉ. सचिन नलावडे ९४२२३८२०४९,

(प्रमुख, कृषी यंत्रे आणि शक्ती विभाग, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्यालय,

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT