Indian Agriculture : आपण गेल्या भागामध्ये फवारणी यंत्रांचे प्रकार पाहिले. फवारणीची गरज, आकारमान, ऊर्जास्रोत आणि उपभोक्त्यांची सोय, सुलभता यांचा विचार फवारणी यंत्रणांच्या आरेखनामध्ये केलेला असतो.
सामान्यतः मानवचलित, यंत्रचलित, वजनाचे हलकी (म्हणजे एका माणसाने सहज नेता येणारी) किंवा जड, जड यंत्रामध्ये चाकांवर किंवा दोन -तीन माणसांनी उचलून नेणे शक्य असलेली असे वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत.
उदा. लिव्हरने चालविण्याचा पाठीवरचा पंप, बॅटरीवर चालणारा पाठीवरचा पंप, इंजिनवर चालणारा मिस्ट ब्लोअर, इंजिनवर चालणारा एचटीपी पंप, केंद्रोत्सारी पंप इ. पाठीवरील फवारणी पंपामध्ये पूर्वी लिव्हरने चालवायचा पंप वापरला जात असे.
मात्र त्यात सतत लिव्हर हलवून आत टाकीमध्ये द्रावणावर दाब निर्माण करावा लागतो. माणसांसाठीही हा पंप कष्टदायक ठरतो. या फवारणी पंपामध्ये टाकी, हायड्रॉलिक पंप, दट्ट्या (लिवर), तोटी, पाइप आणि नोझल हे महत्त्वाचे भाग असतात. अलीकडे त्याऐवजी बॅटरीवर चालणारे पंप मोठ्या प्रमाणात वापरात येऊ लागले आहेत. हाताने सतत लिव्हर हलविण्याचे काम कमी होते.
ज्या ठिकाणी फळबागा आणि भाजीपाला पिके घेतली जातात. तिथे कीड-रोग व्यवस्थापनासाठी फवारण्यांचे प्रमाण अधिक असते. अशा वेळी इंजिनवर चालणारे मिस्ट ब्लोअर आणि एचटीपी पंप उपयोगी ठरतात.
इंजिननर्मिती ऊर्जेद्वारे जास्त दाब तयार होतो. या जास्त दाबामुळे फवारणीमध्ये बारीक थेंब आणि जादा प्रवाह मिळतो. त्याचा फायदा एकूणच जास्त क्षेत्र व दाट पानावर फवारणीसाठी होतो.
या दोन्ही फवारणी यंत्रांची किंमत आणि देखभाल खर्चही जास्त असतो. मिस्ट ब्लोअर यंत्रामध्ये असलेल्या पंख्याने निर्माण केलेल्या हवेच्या झोताने द्रावणाचे बारीक तुषार झाडाच्या पानावर दोन्ही बाजूंना पोचविले जातात. या सर्व यंत्रांमध्ये पाण्यात विरघळणारी भुकटी, तरंगणारे संहत द्रव, विरघळणारे द्रव आणि वाहणारे संहत द्रव यांची फवारणी करता येते.
कोणत्याही फवारणी पंपाचा महत्त्वाचा भाग म्हणजे नोझल. त्यातही नोझलचे टोक हे फवारणी सर्वांत महत्त्वाचे आणि सर्वात स्वस्त भाग आहे. योग्य नोझल वापरल्यास कीडनाशकाची बचत होते, फवारणी योग्य होऊन पीक संरक्षण चांगल्या प्रकारे होते.
खराब किंवा गळती होणारा नोझल तातडीने बदलला पाहिजे. प्रति मिनिट १ मिलि कीडनाशकाचे द्रावण गळत असेल, तर दिवसभरात ४.८० लिटर द्रावण वाया जाते. आपल्या महागड्या कीडनाशकांच्या किमतीशी सांगड घातल्यास आपले किती नुकसान झाले ते शेतकऱ्यांना समजू शकेल. म्हणूनच योग्य नोझलची निवड, देखभाल आणि गरजेनुसार नोझल त्वरेने बदलणे याकडे लक्ष दिले पाहिजे.
(नोझल कोड व छायाचित्रे स्रोत : अस्पी)
योग्य नोझल निवडणे
नोझल नेमके काय काम करतो?
द्रवाचे बारीक थेंबांमध्ये किंवा कणांमध्ये रूपांतर करणे.
थेंबापासून तयार झालेले तुषार एका विशिष्ट नमुन्यात (पॅटर्न) पसरविणे.
द्रवाचा प्रवाह अपेक्षेइतकाच नियमित ठेवणे.
द्रवाला विशिष्ट संवेग देणे.
नोझलचे प्रकार
विविध कामांसाठी उपयुक्त असे अनेक नोझल बाजारात उपलब्ध आहेत. त्याची कामानुसार निवड करावी.
हॉलोकोन नोझल :
पोकळ शंकूप्रमाणे फवाऱ्यामध्ये बारीक तुषार तयार होतात.
फायदा :
फवारा झाडाच्या पानांमधून बऱ्यापैकी आतपर्यंत घुसतो.
कीटकनाशक फवारणीसाठी उपयुक्त.
फवारणीचा कोन कमी ते मध्यम असतो.
डिस्कचा रंग नोझल कोड स्टॅम्प नं. दाब
(किलो प्रति घन सेंमी) स्प्रे कोनप्रवाह
(सें.मी.३/ मिनिट)
चॉकलेटी HCN/PA ६०२५० ३ (४३ पौंड) ६०
नारंगी HCN/PB ८०४५० ३ (४३ पौंड) ८०
हिरवा HCN/PC १००७०० ३ (४३ पौंड) १००
पिवळा HCN/PI १००९०० ३ (४३ पौंड) १००
निळा HCN/PD १००१३५० ३ (४३ पौंड) १००
फ्लड जेट नोझल :
मोठे थेंब तयार करतो. जास्त रुंद प्रक्षेत्र भिजवतो.
तणनाशक फवारण्यासाठी उपयुक्त.
नोझल कोड स्टॅम्प नं. दाब
(किलो प्रति
घन सें.मी.) स्प्रे.
कोन (अंश) प्रवाह
(घन सें.मी. प्रति मिनिट)
XLP/
WP/४० FTP/४० १०६ (२३ PSI) ६० ५००
ULV/५० ULV/५० १.६ १०५ २७०
ULV/१०० ULV/१०० १.६ ११५ ६६०
ULV/२०० ULV/२०० १.६ १३५ १२००
WFN/२४ WFN/२४ ०.७ (१० PSI) २५ १७२
WFN/४० WFN/४० ०.७ (१० PSI) ४० ४७०
WFN/१६२ WFN/१६२ ०.७ (१० PSI) ९० १२३०
WFN/१७८ WFN/१७८ ०.७ (१० PSI) ११० २०४०
फ्लॅट फॅन नोझल :
मध्यम आकाराचे तुषार तयार करतो.
समप्रमाणात एकसारखी फवारणी करतो.
तणनाशके फवारण्यासाठी उपयुक्त.
फवारणी कोन कमी ते मध्यम असतो.
नोझल कोड स्टॅम्प नं. दाब (किलो प्रति घन सें.मी.) स्प्रे. कोन (अंश) प्रवाह (घन सें.मी. प्रति मिनिट)
XLT ६०६७५ ०.७ (१० PSI) ६० ६७५
Brass tip ८०८०० २.७५ (४० PSI) ८० ८००
डॉ. सचिन नलावडे, ९४२२३८२०४९,
(प्रमुख, कृषी यंत्रे आणि शक्ती विभाग, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.