Tractor Sale agrowon
टेक्नोवन

Tractor Sale In April : पावसाने ट्रॅक्टर विक्रीवर 'अवकळा' ; एप्रिल महिन्यामध्ये ११ टक्क्यांनी झाली घट

Agriculture Automobile Growth : मागील आर्थिक वर्षांत ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये ट्रॅक्टरची विक्री विक्रमी झाली होती. पण यंदाच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातील एप्रिलमध्ये ट्रॅक्टराच्या विक्रीमध्ये मोठी घट झाल आहे.

test

Tractor Sales Growth : कोविडच्या संकटानंतर २०२२ हे वर्ष भारताच्या ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी चांगले गेले. त्यामध्ये ट्रॅक्टरची विक्रीही चांगली झाली होती. मात्र, यंदा अवकाळी पाऊस आणि गारपीठीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्याचा फटका ऑटोमोबाईल क्षेत्रालाही बसला आहे. एप्रिल २०२२ च्या तुलनेत एप्रिल २०२३ मध्ये देशांतर्गत ट्रॅक्टरची विक्री आणि निर्यात घटली.

कृषी ऑटोमोबाईलमधील जाणकरांच्या म्हणण्यानुसार खऱाब हवामान आणि अवकाळी पावसामुळे सणासुदी असतानाही गेल्या महिन्याच्या विक्रीत घसरण झाली.

ऑटोमोबाईल क्षेत्रातील नुकत्या जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, एकूण देशांतर्गत ट्रॅक्टर विक्री एप्रिल २०२२ मधील ८९ हजार २०१ युनिट्स होती. तर या वर्षी एप्रिलमध्ये ११ टक्क्यांनी घसरून ७९ हजार २८८ युनिट्सवर आली आहे, मार्च महिन्याच्या तुलनेत (८२ हजार ८५६ युनिट्स) या एप्रिलची विक्रीही कमी होती. तर एकूण ट्रॅक्टर उत्पादन एप्रिल २०२२ मध्ये १० हजार ७१५ युनिट्स होती. ती यंदा एप्रिल 2023 मध्ये ७ हजार ६५२ युनिट्सवर लक्षणीय घट झाल्यामुळे निर्यातीवर दबाव कायम आहे.

टॉप ट्रॅक्टर निर्माता कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने एप्रिलमध्ये ३५ हजार ९३८ युनिट्सच्या देशांतर्गत ट्रॅक्टर विक्रीत १० टक्क्यांची घट झाली. एस्कॉर्ट्स कुबोटाच्या ट्रॅक्टरचे व्हॉल्यूम या महिन्यात ५.५ टक्क्यांनी घसरून ७ हजार २५२ युनिट्सवर आले.

महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे हेमंत सिक्का म्हणाले,  यावर्षी मार्चमध्ये चैत्र नवरात्री आणि गुढीपाडव्याच्या सणांमुळे मागणी वाढली. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत एप्रिल महिन्याच्या विक्रीत घट झाली.

कृषी उद्योगाला आलेली मंदी जास्त काळ राहणार नाही. पाण्याची उपलब्धतेची खरीप पेरणीसाठी मदत होईल . तसेच खरीप पिकांचा चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळाल्यास ट्रॅक्टरीची विक्री वाढेल, अशी अपेक्षा आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion MSP Demand: कांद्याला ३००० रुपये हमीभाव देण्याची मागणी

Agriculture Policy: ‘‘महानिर्मिती’तून बांबूला मदत करण्याचे धोरण’

Bamboo Cultivation: मूल्यसाखळीबरोबर बांधकाम, ऊर्जेसाठी बांबूची लागवड गरजेची

Agricultural Equipment Subsidy: यांत्रिकीकरण अनुदानाचे अर्ज रद्द न करण्याचे आदेश

Maharashtra Rain: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT