Agriculture Technology Agrowon
टेक्नोवन

मशागतीसाठी ट्रॅक्टरचा योग्य वापर

नांगरट उताराला आडवी केल्याने पावसाचे पाणी अडवले जाते, जमिनीत मुरते. ट्रॅक्टरला नांगराची जोडणी करताना व्यवस्थितपणे थ्री पॉइंट लिंकेजला जोडून सपाट जागेवर आणावा. दोन वर्षांतून एकदा सबसॉयलरचा वापर करणे आवश्यक आहे.

वैभव सुर्यवंशी

चिकण मातीचे प्रमाण ५० टक्के किंवा त्याहून अधिक असेल, तर अशा जमिनीतील निचराक्षमता सुधारण्याकरिता तीन ते चार वर्षांतून एकदा खोल नांगरट करावी. मध्यम आणि भारी जमिनीमध्ये पिकांची काढणी झाल्याबरोबर नांगरतात. पिकाची काढणी झाल्याबरोबर ज्या जमिनी नांगरता येत नाहीत, त्या वाळून कठीण बनतात. अशा जमिनी वळवाच्या पावसानंतर अगर पावसाळ्यातील पहिल्या पावसानंतर नांगरतात. उन्हाने नांगरटीत निघालेली ढेकळे ठिसूळ होतात आणि ती नंतर औताने फोडणे सोपे जाते. नांगरटीमुळे लहान-मोठी ढेकळे निघतात, जमिनीचा पृष्ठभाग सपाट राहात नाही आणि मग पेरणी करण्यापूर्वी तिची अनेक प्रकारच्या अवजारांनी मशागत करावी लागते. नांगरट झालेल्या जमिनीत पिकाची भरपूर प्रमाणात वाढ होऊन जमिनीत मुळे खोलवर पसरतात.

उताराला आडवी नांगरट करावी. काही जमिनीला दोन ते तीन वर्षांनी जरुरी असते. दर वर्षी नांगरट केल्यामुळे काही ठरावीक खोलीवर कठीण थर निर्माण होतो. त्यामुळे पाण्याचा योग्य निचरा होत नाही. हा तयार झालेला कठीण थर सब सॉयलर नांगराने फोडावा लागतो. नांगरट उताराला आडवी केल्याने वळवाच्या पावसाचे पाणी अडवले जाते, जमिनीत मुरते. नांगरटीमुळे निचरा न होणाऱ्या भारी, चिकण आणि रेताड जमिनीत नायट्रोजन आणि पोटॅशिअम यांचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

नांगरट करतानाची काळजी ः

१. ट्रॅक्टरला नांगराची जोडणी करताना व्यवस्थितपणे थ्री पॉइंट लिंकेजला जोडून सपाट जागेवर आणावा.

२. नांगराचे फाळ दोन्ही जमिनीला समांतर आहे का ते पाहावे, नसल्यास अप्पर लिंक आणि लोअर लिंक व्यवस्थित करावी, जेणेकरून तो समांतर येईल.

३. वरून पहिले असता अप्पर लिंक आणि पीटीओ एकमेकाला समांतर असावेत.

४. पलटी नांगर असेल तर त्याला वंगण केलेले असावे, म्हणजे व्यवस्थित पलटी होईल.

५. नट बोल्ट व्यवस्थित फिट करून घ्यावेत.

ट्रॅक्टर वापरतानाचे नियोजन ः

१) पुढच्या आणि मागच्या चाकातील अंतर समान असावे.

२) वापरात असलेली साधने जसे फाळ, हा जमिनीशी ९० अंशांत काम करणारा असावा.

३) साधा व पलटी केल्यानंतर समान खोलीवर जमिनीत चालला पाहिजे.

४) पाळ्या घालताना वापरात असलेली पट्टी समान खोलीवरील मातीत चालली पाहिजे.

५) सर्व जागी असलेले नट व बोल्ट घट्ट असावेत.

७) ट्रॅक्टर हळू चालवूनच चांगली नांगरट शक्य आहे. काम संपण्याची घाई म्हणून जोरात चालवू नये.

८) नांगरटीत पूर्व पिकांचे सर्व शिल्लक अवशेष पूर्ण गाडले जाणे जरुरीचे आहे.

९) नांगरटीच्या वेळी जमिनीत जर कमी प्रमाणात ओल असेल तर मातीचे कण एकमेकांना जास्त शक्तींनी धरून ठेवतात. याचा परिणाम नांगरटीनंतर मोठमोठी ढेकळे तयार होतात. या ऐवजी मातीत जास्त पाणी असेल तर चिखलणी होते. फाळाबरोबर वर येणारी माती चिकट दिसू लागते. या स्थितीत पुढे पाणी प्रमाण कमी झाल्यावर जास्त घट्टपणा येतो. मुळांना वाढीच्या काळात खोल जाण्यास अडथळा येतो.

१०) सतत एकाच खोलीवर नांगरट केल्यास जमिनीखाली एक

कठीण थर तयार होतो. जो पाण्याला खालच्या थरात जाऊ देत नाही. याच कारणासाठी दोन वर्षांतून एकदा सबसॉयलरचा वापर करणे आवश्यक आहे.

---------------

संपर्क ः वैभव सूर्यवंशी ९७३०६९६५५४

(विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद फार्म, जळगाव)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Cultivation : सततच्या पावसाने ऊस पीक धोक्यात

Crop Damage Survey : सांगली जिल्ह्यातील दीड हजार हेक्टरवरील पंचनामे पूर्ण

Water Project Storage : सातपुड्यातील प्रकल्प भरू लागले

Bajari Sowing : खानदेशात बाजरी पीक जोमात

Crop Insurance : शेतकऱ्यांना मिळणार १२७ कोटींची भरपाई

SCROLL FOR NEXT