Animal Control Machine Agrowon
टेक्नोवन

Crop Protection Machine : पीडीकेव्ही सौरऊर्जाचलित प्राणी प्रतिबंधक यंत्र

Animal Control Machine : सौरऊर्जेवर चालणारे प्राणी प्रतिबंधक यंत्र हे पूर्णतः सूर्यप्रकाशावर चालणारे आहे. यासाठी संयंत्रातील बॅटरी सोलर फोटोव्होल्टिक पॅनेलद्वारे चार्जिंग केली जाते.

Team Agrowon

डॉ. सुरेंद्र काळबांडे, सागर पाटील

Solar Powered Animal Control Device : सौरऊर्जेवर चालणारे प्राणी प्रतिबंधक यंत्र हे पूर्णतः सूर्यप्रकाशावर चालणारे आहे. यासाठी संयंत्रातील बॅटरी सोलर फोटोव्होल्टिक पॅनेलद्वारे चार्जिंग केली जाते. पर्यायाने वीज बचत होते. हे यंत्र पूर्णतः स्वयंचलित असून, सूर्यास्त झाल्यावर सुरू होते, सूर्योदय झाल्यावर बंद होते.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील अपारंपरिक ऊर्जा स्रोत व विद्युत अभियांत्रिकी विभागाने सौरऊर्जेवर चालणारे प्राणी प्रतिबंधक यंत्र विकसित केले आहे. २०२३ मधील संयुक्त कृषी संशोधन परिषदेत या यंत्राच्या शिफारशीस वन्य प्राण्यांपासून शेतातील पिकांची संरक्षण करण्याकरिता मान्यता मिळालेली आहे.

शेतातील पीक जेव्हा अंकुर, रोपाअवस्थेत असते, तेव्हा जंगली वन्यप्राणी उदा. हरिण, नीलगाय, रानडुक्कर हे मुख्यतः रात्रीच्या वेळी पिकांचे जास्त प्रमाणात नुकसान करतात. प्राण्यांच्या नुकसानीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी सौरऊर्जेवर चालणारे प्राणी प्रतिबंधक यंत्र हा एक टिकाऊ आणि किफायतशीर उपाय आहे.

...असे आहे यंत्र
१) यंत्रामध्ये सोलर पॅनेल, चार्ज कंट्रोलर, लिथियम आयन रिचार्जेबल बॅटरी, डी. सी. मोटर, एलईडी लाइट आणि स्पीकर यांचा समावेश आहे.
२) यंत्राच्या वरच्या बाजूला असलेले सौर पॅनेल, सौरऊर्जेचे विजेमध्ये रूपांतर करते. ही वीज रिचार्ज करण्यायोग्य बॅटरीमध्ये साठवली जाते.


३) बॅटरी एलईडी लाइट आणि डीसी मोटरला ऊर्जा पुरवते. मोटारच्या साह्याने यंत्रावरील दिवा १० आरपीएम वेगाने फिरतो. स्पीकरवर ५ मिनिटांच्या अंतराने १० सेकंदापर्यंत यंत्रातून आवाज येतो.
४) यंत्रांतील मोटर एलईडी लाइटला वर्तुळाकारामध्ये फिरवते. त्यामुळे वन्यप्राण्यांना मानवी उपस्थितीची जाणीव होते, तसेच स्पीकरचा आवाज ऐकून वन्यप्राणी घाबरून दूर पळतात.

वैशिष्‍ट्ये :
१) सौरऊर्जेवर चालणारे प्राणी प्रतिबंधक यंत्र हे पूर्णतः सूर्यप्रकाशावर चालणारे आहे. यासाठी संयंत्रातील बॅटरी सोलर फोटोव्होल्टिक पॅनेलद्वारे चार्जिंग केली जाते. पर्यायाने वीज बचत होते.
२) हे यंत्र पूर्णतः स्वयंचलित असून, सूर्यास्त झाल्यावर सुरू होते, सूर्योदय झाल्यावर बंद होते.
या यंत्रावर वातावरणाचा काहीही परिणाम होत नाही.


३) यंत्र हे विनाप्राणघातक नियंत्रण तंत्र आहे. सौरऊर्जेवर चालते, पिकांचे नुकसान टाळते किंवा कमी करते. जनावरांना शेतात प्रवेश करण्यास रोखते.
४) एक यंत्र हे २ हेक्टर क्षेत्रासाठी पुरेसे आहे.

वापर व देखरेख :
१) हे यंत्र शेतातील पिकाच्या मध्यभागी ठेवावे.
२) शेतात ठेवण्याअगोदर इलेक्ट्रॉनिक सर्किटवरील बटण सुरू (ऑन) करून ठेवावे.
३) यंत्राची उंची पिकाच्या उंचीपेक्षा एक ते दोन फूट जास्त असावी.
४) धुके व ढगाळ वातावरण असल्यास दिवसा इलेक्ट्रिक पोर्ट लावून ६ ते ७ तास यंत्राची बॅटरी चार्जिंग करून घ्यावी.

संपर्क ः डॉ. सुरेंद्र काळबांडे, सागर पाटील
(डॉ. सुरेंद्र काळबांडे हे अकोला येथील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात अधिष्ठाता आणि सागर पाटील हे इन्क्युबेशन व्यवस्थापक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Empowerment: परभणीतील ग्रामीण भागात ३४ हजार एकल महिला

Vice President Election 2025 : सी. पी. राधाकृष्णन देशाचे १५ वे नवे उपराष्ट्रपती, इंडिया आघाडीची मते फुटली

Hivare Bazar Village: हिवरे बाजारला ‘जल समृद्ध गाव’ पुरस्कार

Cotton Cultivation: पुणे जिल्ह्यात कापूस लागवडीत होतेय वाढ

Organic Fertilizer Production: कणकवलीत सहा टन निर्माल्यापासून खत निर्मिती

SCROLL FOR NEXT