Forest Fire
Forest FireAgrowon

Forest Fire Protection: वणवे रोखण्यासाठी गावोगाव वणवा प्रतिबंधक पथकांची गरज

आगीत मोर, हरणे, ससे, रानडुकरे, लांडगे व इतर वन्यजीव आपला जीव वाचविण्यासाठी धावत होते. मानवी भविष्यासाठी वनांचे संरक्षण करणे गरजेचे आहे.

Nagar News : दर वर्षी मार्च, एप्रिल, मे महिन्यांत सर्वत्र मोठ्या प्रमाणात वणवे लागतात. त्याला मुख्य कारण म्हणजे शेताची मशागत करताना शेतकरी बांध पेटवून देतात तसेच रस्त्याने जाणारे वाटसरू किंवा वाहनांच्या सायलन्सरमधून ठिणगी पडून मोठ्या प्रमाणात वणवे लागतात. गावोगाव वणवे प्रतिबंधक पथके निर्माण करण्याची गरज असल्याचे पद्मश्री पोपटराव पवार यांनी सांगितले.

Forest Fire
Forest Conservation : मियावॉकी, गवत लागवडीतून वनसंवर्धनाचे प्रयत्न

रविवारी (ता.३०) हिवरे बाजार शेजारील गावांतील शेतकऱ्यांनी शेतातील बांध पेटवल्यामुळे गिरी महाराज मंदिर परिसरातील जंगलाला आग लागली.

Forest Fire
Forest Fire: शिकारीसाठी ठाण्यात डोंगरांना आग

वनक्षेत्राला आग लागल्याचा संदेश ग्रामसुरक्षा यंत्रणेवरून येताच हिवरे बाजार येथील ग्रामवन समिती हिवरे बाजार व वणवा प्रतिबंधक पथक हिवरे बाजार व ग्रामस्थ अवघ्या काही मिनिटांतच वनक्षेत्रातील आगीच्या ठिकाणी हजर झाले व आग आटोक्यात आणली.

ही आग आटोक्यात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला. आगीत मोर, हरणे, ससे, रानडुकरे, लांडगे व इतर वन्यजीव आपला जीव वाचविण्यासाठी धावत होते.

मानवी भविष्यासाठी वनांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. त्यासाठी वणवे आटोक्यात आणण्यासाठी गावोगावी स्वयंप्रेरणेने वणवा प्रतिबंधक पथके तयार करावीत, असेही ते म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com