Agriculture Technology Agrowon
टेक्नोवन

Agriculture Technology : ‘स्मार्ट व्हेजिटेबल ट्रान्सप्लांटर’ यंत्राचा राष्ट्रीय पातळीवर ठसा

‘ॲग्रिकल्चर, फूडटेक अॅण्ड रूरल डेव्हलपमेंट’ या श्रेणीमधून अंतिम फेरीसाठी संपूर्ण भारतातून फक्त पाचच नावीन्यपूर्ण प्रकल्प निवडण्यात आले होते. त्यापैकी विद्यार्थ्यांनी बनवलेला हा संशोधनात्मक प्रकल्प विजेता ठरला.

मुकूंद पिंगळे

नाशिक : चांदवड येथील श्री. नेमिनाथ जैन ब्रम्हचर्याश्रम संचलित स्व.कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी मानव संसाधन विकास मंत्रालयातर्फे (Ministry of Human Resource Development) घेण्यात आलेल्या ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’ (Smart India Hackathon Competition) स्पर्धेत देशपातळीवर ‘ॲग्रिकल्चर’ गटात प्रथम क्रमांक पटकावीत चौथ्यांदा यशाची उज्वल परंपरा कायम ठेवली आहे.

‘ॲग्रिकल्चर, फूडटेक अॅण्ड रूरल डेव्हलपमेंट’ या श्रेणीमधून अंतिम फेरीसाठी संपूर्ण भारतातून फक्त पाचच नावीन्यपूर्ण प्रकल्प निवडण्यात आले होते. त्यापैकी विद्यार्थ्यांनी बनवलेला हा संशोधनात्मक प्रकल्प विजेता ठरला. शिक्षण मंत्रालय व अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद यांनी २०१७ पासून राष्ट्रीयस्तरावर ‘इनोव्हेशन इंफोसिस्टम’ विकसित करण्यासाठी आणि स्टार्टअपला चालना देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली जाते.

२०२२ वर्षातील स्पर्धेत प्रारंभिक फेरीतील निकष पूर्ण करून विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता. विद्यार्थ्यांनी एक लाख रुपये रोख व सन्मानचिन्ह असे पारितोषिक मिळवत राष्ट्रीय स्तरावर यश मिळवले. यामध्ये आदित्य निकम, ज्ञानेश्वर शिंदे, सौरभ पाटील, सिद्धेश गुळवे, ऐश्वर्या अहिरे, सायली पगारे या विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्यांनी ३६ तास अखंड काम करून पूर्ण केला. प्रकल्पासाठी प्रा. विनयकुमार जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.

यंत्राची उपयुक्तता अशी

अगदी सहजपणे बेड तयार करणे.

ड्रीप पसरविणे, पॉली मल्चींग पेपर अंथरणे.

स्वयंचलित भाजीपाल्याचे रोप ट्रेमधून उचलून; मातीत लागवड

अशी सर्व कामे एकाच वेळी ट्रॅक्टरसोबत अथवा ट्रॅक्टरशिवाय करणे शक्य.

आमचे विद्यार्थी तांत्रिक शिक्षणाचा उपयोग शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी वापरतात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
बेलीलाल संचेती, अध्यक्ष, विश्वस्त समिती, श्री.नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम.
ग्रामीण भागाशी नाळ असलेल्या या महाविद्यालयाची मोहोर वेळोवेळी देशपातळीवर उमटली आहे. ‘स्मार्ट व्हेजिटेबल ट्रान्सप्लांटर’ हा त्यापैकीच एक आविष्कार असून याचे पेटंट देखील करण्यात आले आहे. या आविष्काराने भाजीपाला लागवड प्रक्रियेतील समस्यांचे निराकरण होऊन शेतकऱ्यांच्या लागवड खर्चात निश्चितच मोठी बचत होणार आहे.
सुनीलकुमार चोपडा, समन्वयक, एस.एन.जे.बी.अभियांत्रिकी महाविद्यालय

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

Fake Agri Inputs: निविष्ठांवर सरकारचे नियंत्रण किती?

Whatsapp Chatbot: महसूल विभागाच्या सेवांसाठी देणार ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’

Eknath Shinde: कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार नाही

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी?

SCROLL FOR NEXT