नवी दिल्ली ः फळे व भाज्या नाशीवंत (Perishable Vegetable) असल्याने त्या लवकर खराब होतात. त्यांचा ताजेपणा टिकून राहण्यासाठी गुवाहाटीतील भारतीय औद्योगिक संस्थेतील (Indian Institute Of Technology) (आयआयटी) संशोधकांनी खाद्य आवरणाची (Edible Coating) (इडिबल कोटिंग) निर्मिती केली आहे. यामुळे फळे-भाज्या जास्त काळ टिकून राहू शकतील.
खाद्यपदार्थ वाया जाण्याचे प्रमाण कमी होण्याच्या उद्देशाने खाद्य आवरणाचा शोध लावला आहे. यासंबंधीचा संशोधनपर लेख ‘एसीएस फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी’ या नियतकालिकामध्ये प्रकाशित केला आहे. या खाद्य आवरणासंबंधीचा प्रयोग बटाटा, टोमॅटो, हिरवी मिरची, अननस, सफरचंद आणि किवी आदी भाज्या व फळांवर घेण्यात आली.
या विशेष खाद्य आवरणामुळे फळे व भाजीपाल्यांचा साठवण कालावधी दोन महिन्यांपर्यंत वाढविणे शक्य होते, तसेच ते ताजे राहतात, अशी माहिती आयआयटी गुवाहाटीतील रासायनिक अभियांत्रिकी विभागातील प्रा. विमल कटियार यांनी दिली. आवरणानंतर टोमॅटो एक महिन्यापर्यंत टिकून राहतात. केवळ पाच दिवस चांगल्या राहणाऱ्या स्ट्रॉबेरीवर खाद्य आवरण लावल्यास त्या २० दिवसांनंतरही खाण्यालायक असतात, असे निरीक्षण नोंदविण्यात आले.
सूक्ष्म शैवालाचा (मायक्रो अल्गी) अर्क आणि पॉलिसेकेराइट हे एक प्रकारचे कर्बोदक खाद्य आवरणात आहे. डुनालीएला टेरिओलेक्टा या सागरी सूक्ष्म शैवालीतून अर्क काढला जातो. शैवाल तेल हा माशांपासून तयार केलेल्या तेलाला एक पर्याय असून आरोग्यपूरक आहे. शैवालातून तेल काढल्यानंतर चोथा फेकून दिला जातो. याच चोथ्याचा वापर कटियार व त्यांच्या चमूने खाद्य आवरण तयार करण्यासाठी केला. त्यात कायटोसन (एक प्रकारची साखर) मिसळले जाते. ही साखर जलचरापासून तयार केली जाते.
आनंदी जीवनासाठी सात्त्विक
ताजी फळे-भाज्या खाण्याचा सल्ला कायमच दिला जातो. त्याचप्रमाणे गीतेतील सहाव्या अध्यायातील १६ आणि १७ व्या श्लोकात आहार कसा असावा, याबद्दल मार्गदर्शन केले आहे. त्यानुसार सात्त्विक, राजस आणि तामस या गुणांवर आधारित आहार असतो. दीर्घायुष्य देणारा, हृदय बळकट करणारा, सुख व तृप्तीची भावना जागवणारा, जीवनात आनंद देणारा सात्त्विक आहार मानवाला प्रिय असतो. सात्त्विक आहार रसपूर्ण असतो.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.