Fisheries Technology : नव्या मत्स्यपालन तंत्रज्ञानामुळे वाढले उत्पन्न

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या गुवाहाटी (आसाम) येथील केंद्रीय गोड्या पाण्यातील मत्स्य संशोधन संस्थेने ईशान्य भारतातील मत्स्यपालनासंदर्भातील प्रोटोकॉल विकसित केले आहेत.
Fisheries
FisheriesAgrowon

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (Indian Council Of Agriculture Research) गुवाहाटी (आसाम) येथील केंद्रीय गोड्या पाण्यातील मत्स्य संशोधन संस्थेने (Fisheries Research Center) ईशान्य भारतातील मत्स्यपालनासंदर्भातील (Fisheries) प्रोटोकॉल विकसित केले आहेत. त्यामध्ये कल्चर बेस्ड फिशरीज (CBF) आणि पेन कल्चर टेक्नॉलॉजी फॉर फ्लडप्लेन वेटलॅंड्स (Beels) यांचा समावेश आहे. या नव्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे ६५ बोडो आदिवासींच्या मासे उत्पादनामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये ११७ टक्क्यांनी वाढ झाली, तर एकूण उत्पन्नामध्ये १५३ टक्क्यांनी वाढ झाली.

ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यातील बामुनी बिल या बंदिस्त पूरबाधित क्षेत्र आहे. त्याचा विस्तार हा १६ हेक्टर आणि अंडाकृती असा आहे. मॉन्सूनमध्ये येथील पाण्याची खोली २.५ ते ३ मीटरपर्यंत असते, ती हिवाळ्यांमध्ये कमी होऊन १.५ ते २ मीटरपर्यंत राहते. या गोड्या पाण्यामध्ये पेन कल्चर आणि कल्चर बेस्ड मत्स्यपालनासाठी योग्य आहे.

Fisheries
Fish Seed:मत्स्यबीज वाहतूक, संचयनाचे महत्त्व

बेजारा मंडलामधील बामुनीगाव येथील सुमारे ६५ बोडो आदिवासी कुटुंबे उदरनिर्वाहासाठी त्यावर अवलंबून आहेत. सन २००६-०७ पूर्वी या बिलमध्ये सामान्यतः मासेमारी होत असे. मासेमारीसाठी हा तलाव दरवर्षी खासगी लोकांना १५ ते २० हजार रुपये प्रति महिना इतक्या कमी दराने भाड्याने दिला जाई.

त्यामध्ये माशांच्या संवर्धनासाठी कोणतेही प्रयत्न होत नसल्यामुळे दिवसेंदिवस त्यातून मिळणाऱ्या माशांचे प्रमाण कमी होत चालले होते. त्यातून प्रति वर्ष अंदाजे ६.२९ टन मासे मिळत, त्यातून या समुदायातील लोकांना २०१९ -२० या वर्षी प्रति कुटुंब केवळ १७६९२ रुपये हाती आले.

...असा राबवला कार्यक्रम

बोडो मासेमार आदिवासी समुदायाच्या उत्पन्नामध्ये भर पडावी, या उद्देशाने संस्थेने या तलावामध्ये या समुदायाच्या सहकार्याने सीबीएफ आणि पेन कल्चर यांचे प्रात्यक्षिक करण्याचे ठरवले. त्यामध्ये या लोकांमध्ये जागरूकता तयार करण्यासाठी कार्यक्रम राबवण्यात आले. त्यानंतर १९ ऑक्टोबर २०२० मध्ये पूरक म्हणून मत्स्यबीज सोडण्याचे कार्यक्रम राबवला. त्यानंतर २३ फेब्रुवारी २०२१ मध्ये पेन कल्चरसाठी पिंजरे बसवण्यात आले. संस्थेने प्रति हेक्टरी ३००० या प्रमाणे ४८००० बोटुकल्या सोडल्या. त्यामध्ये येथील लोकांशी चर्चा करून इंडियन मेजर कार्प, मायनर कार्प आणि परदेशी कार्प या माशांच्या प्रजाती सोडल्या.

Fisheries
Fish Farming : एकात्मिक मत्स्यशेतीला संधी...

संस्थेने एडीपीई चे ३०० वर्गमीटर क्षेत्रफळाचे पिंजरे बसवले. त्यात प्रति वर्गमीटर ३ ते ९ या प्रमाणात कार्प बोटुकल्या सोडल्या. त्यांच्या खाद्यासाठी पाण्यावर तरंगणारे खाद्य (केजग्रो फ्लोटिंग फीड - २८ टक्के क्रूड प्रथिने) देण्यात आली. या पिंजऱ्यामध्ये सहा महिन्यांसाठी मासे वाढवण्यात आले. त्यानंतर ७ सप्टेंबर २०२१ मोठ्या आकाराचे मासे बाहेर काढण्यात आले. लहान आकाराचे मासे पुन्हा त्यामध्ये सोडले. सर्वाधिक मासे काढणी १२ आणि १३ जानेवारी २०२२ रोजी करण्यात आली. या माशांची विक्री आसामी लोकांचा सण असलेल्या माघ बिहू या वेळी करण्यात आली. त्यामुळे माशांना चांगला दर (सरासरी २३० रुपये प्रति किलो) मिळाला. २०२१ -२२ आतापर्यंत या बिलमधून सुमारे १३.५२ टन मासे मिळावे असून त्याची विक्री करण्यात आली.

या गावातील ६५ बोडो मासेमार कुटुंबीयांना या वर्षामध्ये प्रति कुटुंब ४४७६३ रुपये उत्पन्न मिळाले. नव्या तंत्रज्ञानामुळे २०१९-२० च्या तुलनेमध्ये या तलावातून मिळालेल्या माशांच्या उत्पादनामध्ये ११७ टक्क्याने वाढ झाली, तर एकूण उत्पन्नामध्ये १५३ टक्क्याने वाढ झाली. या नव्या तंत्रज्ञानाचे सिफ्री पेन एचडीपीई आणि सिफ्री केजग्रो हे दोन नोंदणीकृत ट्रेडमार्क भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या नावाने घेण्यात आलेले आहेत.

(स्रोत ः केंद्रीय गोड्या पाण्यातील मत्स्यपालन संशोधन संस्था, बराकपोर, कोलकाता)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com