Agriculture Technology Agrowon
टेक्नोवन

सोयाबीन पिकाच्या फवारणी आणि काढणीसाठीची आधुनिक यंत्रे

अलीकडे सोयाबीन पिकाखालील लागवड वेगाने वाढली असून, ते प्रमुख पिकांपैकी एक झाले आहे. या पिकामध्ये यांत्रिकीकरणाच्या मोठ्या संधी असून, त्याबाबत सातत्याने काम केले जात आहे. या पिकामध्ये वापरण्यासाठी यंत्रे, अवजारे यांची माहिती घेऊ.

डॉ. तुळशीदास बास्टेवाड
सौरचलित बॅटरी फवारणी यंत्र

१) सौरचलित बॅटरी फवारणी यंत्र

-शेतातील पिकांवर फवारणी करत असतानाही बॅटरी चार्ज करते. चार्जिंगसाठी सौरऊर्जेचा वापर करते.

-या यंत्रामध्ये सौरऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत केले जाते.

-या यंत्रासाठी सोलर पॅनेल, १२ व्होल्ट बॅटरीची आवश्यकता असते.

-टाकी क्षमता- १५ लिटर.

मनुष्यचलित सायकल फवारणी यंत्र

२) मनुष्यचलित सायकल फवारणी यंत्र

-पिकांवरील कीटक व रोग नियंत्रणासाठी पाणी मिश्रित कीडनाशकांची फवारणीसाठी उपयुक्त.

-हे यंत्र हाताळण्यास सोईस्कर आहे.

- द्रावण आणि भुकटीच्या स्वरूपात कीटकनाशकांचा वापर करता येतो.

-फवारणीसाठी लागणाऱ्या वेळेत व खर्चात बचत.

-टाकीची क्षमता ११.५ लिटर.

ट्रॅक्टरचलित एअर बूम फवारणी यंत्र

३) ट्रॅक्टरचलित एअर बूम फवारणी यंत्र

- कापूस, सोयाबीन, वाटाणा इ. पिकावरील कीटकनाशक व तणनाशक फवारणीसाठी उपयोग होतो.

-फवारणीसाठी लागणाऱ्या वेळेत, श्रमात व खर्चात बचत होते.

स्वयंचलित एअर बूम फवारणी यंत्र हाय ग्राउंड क्लिअरन्स

४) स्वयंचलित एअर बूम फवारणी यंत्र हाय ग्राउंड क्लिअरन्स

- कापूस, सोयाबीन, वाटाणा इ. पिकावरील कीटकनाशक व तणनाशक फवारणीसाठी उपयोग होतो.

-फवारणीसाठी लागणाऱ्या वेळेत, श्रमात व खर्चात बचत होते.

स्वयंचलित रिपर

५) स्वयंचलित रिपर

- ५ अश्‍वशक्ती डिझेल इंजिनवर चालते.

-एका दिवसात दोन ते तीन हेक्टर क्षेत्रावरील कापणी करता येते.

- पारंपरिक पद्धतीपेक्षा खर्चामध्ये ८० ते ९० टक्के बचत.

ट्रॅक्टरचलित सोयाबीन काढणी यंत्र - रिपर

६) ट्रॅक्टरचलित सोयाबीन काढणी यंत्र - रिपर

-१८ व त्यापेक्षा जास्त अश्‍वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालवता येते.

-एका दिवसात दोन ते तीन हेक्टर क्षेत्रावरील कापणी करता येते.

-पारंपरिक पद्धतीपेक्षा खर्चामध्ये ८० ते ९० टक्के बचत.

मिनी हार्वेस्टर

७) मिनी हार्वेस्टर

-१२ अश्‍वशक्ती डिझेल इंजिनवर चालते.

-एका दिवसात दोन ते तीन हेक्टर क्षेत्रावरील पिकांची कापणी व मळणी करता येते.

-पारंपरिक पद्धतीपेक्षा खर्चामध्ये ८० ते ९० टक्के बचत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Manikrao Kokate Controversy : बेगानी शादीमें अब्दुल्ला दिवाना

Atal Pension Yojana : आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून?

ITI Modernization : राज्यातील शंभर ‘आयटीआय’चे बळकटीकरण करणार

Hybrid Calves Crisis : संकरित गाईंची नर वासरे झाली नकोशी

Dam Water Discharge : पावसाचा जोर वाढल्याने पुणे जिल्ह्यातील 19 धरणांतून विसर्ग

SCROLL FOR NEXT