Agriculture Mobile App Agrowon
टेक्नोवन

Agriculture Mobile App : कृषी माहितीसाठी मोबाइल ॲप

Mobile App : काही कृषिविषयक माहिती देणारे ॲप शेतीसाठी उपयुक्त ठरत आहेत. शेतकऱ्यांना या ॲपचा वापर करणे सोपे जावे यासाठी बऱ्याच ॲपमध्ये स्थानिक भाषेसह हिंदी, इंग्रजी भाषा उपलब्ध केली जाते.

Team Agrowon

Mobile : आजचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांच्या हाती स्मार्टफोन आणि त्यात वेगवाने इंटरनेट सेवा आलेली आहे. शेतकरीदेखील बदलत्या तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये अवलंब करत आहेत. त्यासाठी काही कृषिविषयक माहिती देणारे ॲप शेतीसाठी उपयुक्त ठरत आहेत. शेतकऱ्यांना या ॲपचा वापर करणे सोपे जावे यासाठी बऱ्याच ॲपमध्ये स्थानिक भाषेसह हिंदी, इंग्रजी भाषा उपलब्ध केली जाते. हे ॲप गुगल प्लेस्टोअरवरून विनामूल्य म्हणजेच फ्रीमध्ये आपल्या मोबाइलमध्ये डाउनलोड करता येतात.

अशा ॲप्सद्वारे शेती पद्धती, यंत्रसामग्री, बाजारभाव, पेरणीची परिस्थिती अशा प्रकारे अनेक माहिती मिळू शकते. बहुतांश ॲपही मोफत डाउनलोड करता येतात.
शेतीविषयक सल्ले मोबाइलच्या माध्यमातून देण्यासाठी कृषी क्षेत्राशी संबंधित नवनवीन मोबाइल ॲप्स विकसित करण्यात येत आहेत. त्याबद्दलची माहिती पुढील प्रमाणे...

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

किसान रथ ः
- गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन ‘KISAN’ असे टाइप करून हे ॲप डाउनलोड करता येते.

मिळणारी माहिती ः
- कृषी तसेच फलोत्पादन उत्पादनांची वाहतूक करण्यासाठी वाहतूक सेवा प्रदात्यांना शोधण्यासाठी आणि संपर्क साधण्याची सुविधा.
- ॲपमध्ये नोंदणी केल्यानंतर शेतीमाल वाहतुकीसाठी वाहतुकीची सेवा देणाऱ्यांची माहिती मिळते.
- हिंदी आणि इंग्रजीसह निवडक भाषांमध्ये उपलब्ध.

ॲग्री मार्केट मोबाइल ॲप ः
- केंद्र शासनाद्वारे विकसित.
- गुगल प्लेस्टोअरमध्ये जाऊन AgriMarket असे टाइप करून हे ॲप डाउनलोड करता येते. किंवा mKisan पोर्टवरून डाउनलोड करता येते.
- ॲपमधून माहिती मिळविण्यासाठी मोबाइल जीपीएस कार्यान्वित करणे आवश्यक आहे.
- त्यानंतर आपल्या ठिकाणापासून ५० किमी अंतरामध्ये येणाऱ्या बाजारपेठांतील विविध पिकांच्या बाजारभावांची माहिती मिळते.

किसान सुविधा ॲप ः
- गुगल प्लेस्टोअरमध्ये जाऊन kisan suvidha असे टाइप करून हे ॲप डाउनलोड करता येते.
- शेतीविषयक विविध माहिती उपलब्ध.
- हिंदी, इंग्रजीसह काही स्थानिक भाषांमध्येही उपलब्ध.
- राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध सेवा आणि योजनांबाबत माहिती पुरविते.

पुसा कृषी ः
- भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) यांच्याद्वारे विकसित.
- विविध पिकांच्या नवीन वाणांविषयी माहिती, संसाधन संवर्धन पद्धती.
- कृषीमध्ये आवश्यक विविध यंत्रसामग्री विषयी माहिती.

e-NAM नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट (NAM) ः
- ई-नाम म्हणजे राष्ट्रीय कृषी बाजार.
- एक देश एक व्यापार या संकल्पनेवर आधारित ई-नाम सुविधा आहे. देशातील शेतकऱ्यांना हव्या त्या बाजारपेठेत शेतीमाल विकण्याचं स्वातंत्र्य हेच ई-नामचं उद्दिष्ट आहे.
- ई-नामची enaam.gov.in ही अधिकृत वेबसाइट आहे.

कसे कराल डाउनलोड ः
- ई नाम ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. त्यासाठी मोबाइलमधील प्ले स्टोअरमध्ये जाऊन e nam असे इंग्रजीत टाइप करावे. त्यानंतर मोबाइल स्क्रीनवर आलेल्या विविध ॲपमधून अधिकृत लोगो असलेले ॲप डाउनलोड करावे.

फायदे ः
- जवळच्या बाजारातील शेतीमालाचे भाव पाहू शकता. तसेच शेतीमालाची खरेदी-विक्री करू शकता.
- शेतीमालाचे ऑनलाइन पद्धतीने व्यवहार ई-नामच्या माध्यमातून करता येतात.
- व्यवहार अधिक सोप्या पद्धतीने करण्यासाठी २०२२ मध्ये ई-नाम या ॲप लॉँच करण्यात आले. त्यामुळे घरी बसून मोबाइल ॲपच्या मदतीने माहिती बाजारभावाची माहिती मिळू लागली.
- ॲपमध्ये भाषा निवडण्याचा पर्याय दिसतो. त्यातून मराठी किंवा आपल्या सोयीनुसार भाषा निवडू शकता.
- विविध बाजारपेठांतील दरांची माहिती मिळते.

८) क्रॉप डॉक्टर ः
- हे ॲप इंदिरा गांधी कृषी विद्यापीठ रायपूर (छत्तीसगड) यांनी विकसित केले आहे.
- गुगल प्लेस्टोअरमध्ये जाऊन Crop Doctor असे इंग्रजीमध्ये टाइप करावे. त्यानंतर अधिकृत लोगो असलेले ॲप डाउनलोड करावे.
- ॲपमध्ये विविध भाजीपाला पिके, कडधान्ये पिके, तेलबिया पिके अशा विविध पिकांबाबत माहिती मिळते. पिकांवर येणारे विविध कीड-रोग, पोषक तत्त्वांच्या कमतरतेची लक्षणे अशी विविध माहिती मिळते.
- ॲप इंग्रजी आणि हिंदी भाषेत उपलब्ध आहे.
- याशिवाय विविध कृषी योजना, शेती अवजारे, आणि दैनंदिन कृषी विषयक बातम्या उपलब्ध आहेत.

ॲग्रोवन ः
- शेतीविषयक दैनंदिन माहिती देणारे पहिले मराठी वृत्तपत्र म्हणून ॲग्रोवन ओळखले जाते. या वृत्तपत्रामध्ये विविध पिकांविषयीचे कृषी सल्ले, तज्ज्ञांचे मार्गदर्शक सल्ले, पीक संरक्षणाविषयी इत्यंभूत माहिती मिळते. याशिवाय दैनंदिन बाजारभावाविषयी देखील सखोल माहिती पुरविली जाते. राज्यातील प्रगतीशील शेतकऱ्यांनी केलेल्या विविध प्रयोगांच्या यशकथा देखील दिल्या जातात.
- ॲग्रोवन वृत्तपत्राप्रमाणेच ॲग्रोवन ॲपमध्ये ही सर्व अपडेटेड माहिती उपलब्ध आहे.
- ॲप डाउनलोड करण्यासाठी गुगल प्लेस्टोअरमध्ये जाऊन agrowon असे इंग्रजीमध्ये टाइप करावे. त्यानंतर ॲग्रोवनचा अधिकृत लोगो असलेले ॲप डाउनलोड करावे.
- त्याशिवाय अधिकृत ॲग्रोवन संकेतस्थळावर दैनंदिन वृत्तपत्राचा ई-पेपरदेखील उपलब्ध होतो.

मिळणारी माहिती ः
- दैनंदिन बाजारभाव.
- तज्ज्ञांचे कृषिविषयक माहिती देणारे तांत्रिक सल्ले, लेख.
- कृषिविषयक बातम्या.
- पीक संरक्षणविषयी माहिती.
- कृषिपूरक व्यवसायांची माहिती.
दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन आणि मत्स्यपालन यांसारख्या कृषी आधारित क्रियाकलापांचा समावेश आहे.

पीकविमा ॲप
- शेतकऱ्यांना मोबाइलवरून पीकविमा नोंदणी करता येण्यासाठी केंद्र सरकारद्वारे हे ॲप उपलब्ध करण्यात आले आहे.
- गुगुल प्लेस्टोअरमध्ये crop Insurance नावाने हे ॲप उपलब्ध आहे.
- या ॲपच्या मदतीने घरबसल्या पीकविम्यासाठी पिकांची नोंदणी करणे शक्य होते.
- ॲप डाउनलोड केल्यानंतर प्रथम त्यामध्ये संबंधित शेतकऱ्याचा चालू मोबाइल क्रमांक टाकून नंतर त्याची संपूर्ण वैयक्तिक माहिती भरावी लागते. त्यानंतर पुढील नोंदणी करणे शक्य होते.
-----------------------
- बी. जी. म्हस्के, ९०९६९६१८०१
(एम. जी. एम. नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय, गांधेली, छ. संभाजीनगर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Market : पुसद बाजार समितीत चोवीस हजार क्विंटल सोयाबीन खरेदी

Agriculture Irrigation : ‘धरणातून रब्बी हंगामासाठी पाणी आवर्तने सोडा’

Agriculture Department : दोन महिन्यांत अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती करा

Farm Pond : धाराशिवला दहा वर्षांत उभारली ४ हजार २६२ शेततळी

Tree Cutting Tender : हजारो झाडांचा अवघ्या दीड लाखाला सौदा

SCROLL FOR NEXT