AI-DISC Mobile App: पिकांवरील रोगांचं अचूक निदान करणारं मोबाईल ॲप?

दिवसेंदिवस विविध कारणांनं पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. पिकांच्या ऐन वाढीच्या अवस्थेत रोगांच्या प्रादुर्भावानं उत्पन्नात घट येते. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फटका बसतो.
AI-DISC Mobile App
AI-DISC Mobile AppAgrowon

बलवान कृषीच्या यंत्रांना आयएसआयची मान्यता

आर्टिफिशल इंटेलिजन्सचा वापर शेतीक्षेत्रात वाढतोय. विविध खाजगी कंपन्यां या क्षेत्रात उतरू लागल्या आहेत. त्यामुळे कृषी यांत्रिकीकरणाला चालना मिळतेय. नुकतेच बलवान कृषी या कंपनीनं आयएसआय प्रमाणित कृषी यंत्रांची नवीन श्रेणी भारतीय बाजारात दाखल केली आहे. वॉटर पंप, ब्रश कटर बॅकपॅक आणि साइड पॅक, पोर्टेबल स्प्रेअर आदि उपकरणांसाठी भारतीय मानक संस्थेने मान्यता दिली आहे. या उपकरणांच्या मदतीनं पीक उत्पादनात वाढ होईल आणि शाश्वत शेती पद्धतींना चालना मिळेल, दावा कंपनीनं केला आहे.

केंद्राकडून कृषी यांत्रिकीकरणासाठी नगरला ५१ कोटींचा निधी

केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कृषी विकासाला प्राधान्य दिले जात आहे. कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या अंमलबजावणीसाठी अहमदनगर जिल्ह्याला ५१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. देशातील कृषिक्षेत्राला स्थिरता देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या प्रमाणावर निधी दिला. कृषी क्षेत्रातील वाढत्या यांत्रिकरणाचा विचार करून विविध योजनांतून शेतकऱ्यांना सहाय्यभूत ठरतील आशा योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे सुरू आहे, अशी माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.

AI-DISC Mobile App
Agriculture Machinery : दोन इंजिनिअर तरूणांनी शोधला मजूर टंचाईवर उपाय; अकोल्यात केली ३५ प्रकारच्या शेती अवजारांची निर्मिती

उत्तरप्रदेशात धान्यापासून इथेनॉल निर्मितीकडे उद्योगांचा कल 

केंद्र सरकार इथेनॉल उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे उसासह धान्यांपासून इथेनॉल निर्मितीकडे उद्योगांचा कल वाढतोय. अलीकडेच उत्तरप्रदेशमधील बलरामपुर येथे उसामध्ये गोड ज्वारीचं आंतरपीक घेण्याचे प्रयोग करण्यात आले आहेत. साखर उत्पादनात आघाडीवर असलेल्या उत्तरप्रदेशमध्ये आता त्रिवेणी इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रीने धान्यापासून इथेनॉल निर्मिती केली आहे. त्यामुळे इथेनॉल उत्पादनातही वाढ झाली असून धान्य आधारित इथेनॉलला प्राधान्य देण्यात येणार असल्याचं त्रिवेणीकडून सांगण्यात येत आहे.

केरळमध्ये मसाले विक्रीसाठी ऑनलाईन पोर्टल

केरळ मसाले उत्पादनात महत्त्वाचं राज्य आहे. त्यामुळे कोझिकोडच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पाइसेस रिसर्चने स्पाइस्री ही मसाल्यासह अन्य कृषी उत्पादनाच्या विक्रीसाठी ऑनलाइन पोर्टल सुरू केलं आहे. यामध्ये केरळमध्ये उत्पादित होणारी सौंदर्यप्रसाधने, मसाले पावडर आणि लागवड साहित्य, जैव-खते आणि आयआयएसआर नर्सरीमध्ये विकसित केलेल्या १५० हून अधिक कृषी उत्पादनांची विक्री करण्यात येणार आहे. कृषी स्टार्ट-अप्सची बाजारपेठ वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मोबाइल अॅप सुचवणार पिकांच्या रोगांवर उपाय? 

दिवसेंदिवस विविध कारणांनं पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. पिकांच्या ऐन वाढीच्या अवस्थेत रोगांच्या प्रादुर्भावानं उत्पन्नात घट येते. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फटका बसतो. परंतु यावर नवी दिल्ली येथील भारतीय कृषी सांख्यिकी संशोधन संस्थेनं अँड्रॉइड मोबाइल ॲप विकसित केलं आहे. त्याचं नाव ‘एआय- डिस्क’ म्हणजेच आर्टिफिशयल इंटेलिजन्स बेस्ड डिसीज आयडेंटीफिकेशन सिस्टम असं आहे.

या मोबाईल अॅपचा वापर करून पिकावरील कीड आणि रोगाचं निदान करता येतं. तसंच रोग आणि किड नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुचविण्याचं कामही अॅप करतं. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पांतर्गत या अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. या ॲपमध्ये फळे, भाजीपाला, तृणधान्ये आणि इतर १९ प्रमुख भारतीय पिकांची आणि त्यावरील साठहून अधिक रोगांच्या माहितीचा समावेश आहे. त्यामुळे देशातील प्रमुख पिकांवरील रोगांची माहिती या अॅपमधून शेतकऱ्यांना मिळते. त्यातून शेतकरी अचूक उपाययोजना करू शकतात.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com